Jalgaon News: खानदेशात रब्बी हंगामात पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. खतपुरवठा सुरळीत असून, युरिया पुरेसा उपलब्ध आहे. यामुळे यंदा रब्बीत प्रथमच युरिया टंचाई कमी दिसत आहे. .१०.२६.२६ नंतर आता युरियाची मागणी अधिक आहे. अनेक शेतकरी अलीकडे ड्रीपमधून युरिया व १०.२६.२६, डीएपी ही खते देवू लागले आहेत. त्याची टंचाई मागील वेळेस होती. खरिपातही अडचणी आल्या. .Fertilizers Supply: खत पुरवठ्याला गती; युरिया इतर खतांची टंचाई दूर.मध्यंतरी कृषी विभागाने युरिया टंचाईची कारणे काय याचा शोध घेतला. युरियाचे मोठे खरेदीदार, त्याचा पुरवठा, त्याची पाठवणूक, साठा याची तपासणी सतत केली. तसेच अन्य खतांबाबतही ही तपासणी, चौकशी सुरू केली. अजूनही ही तपासणी सुरूच आहे. .Fertilizer Supply : मंजूर आवंटनापेक्षा कमी खतांचा पुरवठा.अशात युरियाची जिल्ह्याबाहेरची पाठवणूक आढळली. त्यावर कारवाई झाली. तसेच विक्रेते, वितरक, पुरवठादार यांच्याशी सतत समन्वय तयार केला. यामुळे रब्बीत युरियासह अन्य खतांची समस्या बऱ्यापैकी दूर झाल्याचे दिसत आहे..खानदेशात रब्बीची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक आहे. युरिया, डीएपी, १०.२६.२६ या खतांची मागणी अधिक आहे. केळीसाठीदेखील त्याचा उठाव आहे. कलिंगड, खरबूज आदी पिकांना बेसल डोससाठी या खतांचा मोठा उठाव असतो. नंदुरबारातील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील जळगाव, पाचोरा, चोपडा आदी भागातही खतसाठा पुरेसा असल्याची माहिती मिळाली. केळी, भाजीपाला पिकांसाठी बारमाही खते, विद्राव्य ख.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.