Criminal Action for Fertilizer Supply Without E-POS: ई-पॉस उपकरण नसतानाही निविष्ठा विक्रेत्याला खत पुरवठा झाल्याचे आढळल्यास थेट कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसे आदेश गुणनियंत्रण निरीक्षकांना देण्यात आले आहे..राज्यात अनेक ठिकाणी ई-पॉसचा गैरवापर होत असून, पॉसमधील नोंदी व प्रत्यक्ष साठ्यामधील तफावत दूर करण्यात कृषी विभागाला अद्यापही यश आलेले नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, जिल्हास्तरीय निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत खताचे विक्री व्यवहार व लिंकिंगबाबत सूचना दिल्या जात आहेत..e-POS Fertilizer Sales: ई-पॉस प्रणालीद्वारे खतांची विक्री करणे बंधनकारक.मात्र, सूचना दिल्यानंतरदेखील लिंकिंग आढळले तसेच प्राप्त झालेले खत योग्य स्थितीत असल्याची (ॲक्नॉलेजमेंट प्रोसेस) खात्री करून न घेताच विक्री चालू असल्याचे आढळल्यावर विक्रेत्यावर कारवाई केली जाणार आहे. मात्र, ई-पॉस नसताना विक्रेत्याला खत पुरवठा केलाच कसा, असा जाब आता कंपनीला विचारला जाईल. असा प्रकार तपासणीत उघड झाल्यास संबंधित डीलरचा जबाब नोंदवून कंपनीवर गुन्हा दाखल केला जाणार आहे..निरीक्षकांना आता एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणालीत (आयएफएमएस) नसलेली खते कुठे विकली जातात, यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अशा संशयित विक्रेत्यांची यादी गुणनियंत्रण कक्षाच्या कृषी अधिकाऱ्याने तयार करावी व स्थळाची तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या तपासणीत ई-पॉस उपकरण नसताना प्रत्यक्षात खतसाठा आढळल्यास अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ नुसार कारवाई केली जाणार आहे..Fertilizer Scam: जादा दराने खते, बियाणे विकणारी दुकाने तपासा.‘‘अशा प्रकरणांमध्ये आता अत्यावश्यक वस्तूंचा गैरवापर केला तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणला असे मुद्दे उपस्थित करीत थेट विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश आम्हाला देण्यात आले आहेत,’’ असे एका मोहीम अधिकाऱ्याने स्पष्ट केले..कामे नाकारणाऱ्या कंपन्यांवर कारवाईखत कंपन्यांकडून रेल्वे रेकद्वारे राज्यभर खते पाठवली जातात. मालधक्क्यावर रेक लागल्यानंतर त्यातील मालाची पडताळणी करणे व त्यानुसार वितरणाबाबत रेक प्लॅन तयार केला जातो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी अशा रेक प्लॅनवर लक्ष ठेवावे व नियोजनानुसार कामे न करणाऱ्या खत कंपन्यांवर कारवाईसाठी कृषी आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवावेत, असे आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.