Farmer Issues: खानदेशात धुळे व नंदुरबारात खतपुरवठा सुरळीत असतानाच जळगाव जिल्ह्यात मात्र खतपुरवठा विस्कळीत किंवा हवा तसा नाही. खतांचा पुरवठा सुरळीत नसल्याने जिल्हा परिषदेचा कृषी विभाग खळबळून जागा झाला असून, यासंबंधी विभागाने कृषी आयुक्तालयाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. .युरिया वितरण व विक्रीचा गोंधळ, ई पॉसचा वापर न करणे असा प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहे. एकही गुन्हा यासंबंधी दोषींवर झालेला नाही. खत विक्रेते जुमानत नाहीत. त्यात खतपुरवठा खरिपासाठी विस्कळीत आहे. रब्बी हंगाम व शिल्लक खतांवर सर्व भिस्त सध्या आहे. जळगाव जिल्हा खत वापरात राज्यात पुढे आहे. .Fertilizer Shortage: केंद्राने खरीप हंगामापूर्वी खत टंचाईची शक्यता फेटाळली; युरियाचा साठा स्थिर.पण युरियाची मोठी टंचाई जिल्ह्यात तयार होत असून, विक्रेते ई पॉससंबंधीचे अद्ययावतीकरण, युरिया वितरण, विक्रीचा सर्व हिशेब कृषी विभागाने मागितल्याने युरियाची विक्री न करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यासंबंधी विक्रेत्यांनी येत्या आठवड्यात बंदही पुकारला आहे..Fertilizer Shortage : पंतप्रधान कार्यालयाने कृषी मंत्रालयाकडून मागवली खत आणि रसायनांची माहिती; केंद्र सरकारकडून उपाययोजना सुरु?.धुळे आणि नंदुरबारातील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांनी खतांची जादा मागणी केली. त्यानुसार या भागात खतपुरवठा झाला. खतांची कोणतीही समस्या या भागात खरिपाच्या तोंडावर येणार नाही, अशी स्थिती आहे..पण जळगाव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मागणी करतानाच जेवढा वापर आहे, तेवढी मागणी नोंदविली. यात खतपुरवठा लक्ष्यांक प्राप्त झाला. पण आता खतांचा पुरवठा विस्कळीत आहे. युरियाचा पुरवठा त्यात अत्यल्प आहे..अल्प पुरवठाजळगाव जिल्ह्यात खरिपासंबंधी या महिन्यात १२ हजार ५०० टन खतांचा पुरवठा अपेक्षित होता. परंतु पुरवठा फक्त साडेतीन हजार टन एवढाच झाला आहे. त्यात युरियाचा पुरवठा अल्प आहे. जिल्ह्यात रब्बीमधील खते शिल्लक आहेत. त्यासंबंधी संरक्षित साठा करण्याचे नियोजनही आहे. परंतु पुढील महिन्यात जिल्ह्यात खतांबाबत मोठी बोंबाबोंब होईल, असे संकेत आहेत. खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आटापिटा करीत असून, पुरवठा, लक्ष्यांक यासंबंधीची माहिती नमूद करून कृषी आयुक्तालयाकडे त्याबाबत पत्रव्यवहार केला जात आहे, अशी माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.