Parbhani News : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात (एप्रिल ते सप्टेंबर कालावधी) ऑगस्ट अखेर पर्यंत विविध ग्रेडच्या ९५ हजार ११ टन खतांचे आवंटन मंजूर आहे. परंतु प्रत्यक्षात ८९ हजार ६९६ टन म्हणजेच मंजूर साठ्यापेक्षा ५ हजार ३१५ टन कमी खतांचा पुरवठा झाला.कमी खतांचा पुरवठा झालेल्या खतांमध्ये डीएपी, युरिया, पोटॅश ही खते आहेत..मार्च अखेरीची शिल्लक व यंदाचा पुरवठा मिळून ऑगस्ट अखेरपर्यंत १ लाख २२ हजार ५७ टन खतांची विक्री झाली. मंजूर आवटंनापेक्षा कमी पुरवठा झाल्यामुळे खतांची तुटवडा आहे.रब्बी हंगामासाठी पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे..जिल्हा परिषद अंतर्गंत जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार परभणी जिल्ह्यात खतांचा वापर सरासरी १ लाख ९६८ हजार टन असून खरीप हंगाम २०२५ (एप्रिल ते सप्टेंबर कालावधी) विविध ग्रेडच्या १ लाख ५९ हजार ७०० टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती..Fertilizer Production: युरिया, ‘एनपीके’च्या उत्पादनात मोठी वाढ.परंतु जिल्ह्याला विविध ग्रेडची १ लाख ४५ हजार ११४ टन रासायनिक खते मंजूर केली आहेत. मागणी पेक्षा १४ हजार ५८६ टन कमी परंतु गतवर्षीच्या (२०२४) तुलनेत २१ हजार ८१४ टन अधिक खते मंजूर आहेत. यंदा १ एप्रिल पासून २८ ऑगस्ट पर्यत ८९ हजार ६९६ टन खतांचा पुरवठा झाला..मंजूर आवंटनापेक्षा डिएपीचा ६ हजार ३०९ टन, युरियाचा ३ हजार ६० टन, पोटॅशचा २४५ टन कमी पुरवठा झाला. परंतु एनपीके संयुक्त ग्रेडच्या खतांचा ४ हजार १०७ टन तर सुपर फॉस्फेटचा १८९ टन जास्त पुरवठा झाला. यंदाचा पुरवठा व मार्चअखेरची शिल्लक मिळून एकूण १ लाख ३७ हजार ६३९ टन खते उपलब्ध होती..Fertilizer Overpricing : खतांची चढ्या दराने विक्री भोवली.त्यातून १ लाख २२ हजार ५७६ टन खतांची विक्री झाली. त्यात युरिया ३६ हजार ५५७ टन, डीएपी ७ हजार ४४० टन, पोटॅश ३ हजार ५६ टन, एनपीके ६३ हजार ८४० टन, सुपर फॉस्फेट ११ हजार ६८२ टन या खतांचा समावेश आहे. .यंदाच्या मंजूर आवंटनापैकी ५० हजार १०३ टन खतांचा पुरवठा बाकी आहे. सिंचन स्त्रोतांना पाणी उपलब्ध झाल्यामुळे रब्बी च्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे खतांची मागणी वाढू शकते. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.