Gadchirolin News : संततधार पावसामुळे हवालदील झालेल्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता खताच्या उपलब्धतेचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता कृषी केंद्र व्यावसायिकांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. .पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर तसेच नागपूरचा काही भाग अशा क्षेत्रात धानाची लागवड होते. या पिकाची अपेक्षित उत्पादकता साधण्यासाठी हंगामात मोठ्या प्रमाणावर खताची गरज भासते. मात्र गेल्या काही वर्षांपासून धानपट्ट्यातील शेतकऱ्यांना खत टंचाईच्या मोठ्या समस्येला सामोर जावे लागत असल्याचे चित्र आहे. .यावर्षी स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शेतकरी खतासाठी कोणत्याही दुकानात गेल्यास त्याला खत नसल्याचे सांगत आल्यापावली परत पाठविले जाते. यातूनच शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे संततधार पावसापासून पीक वाचविण्याचे आव्हान असताना दुसरीकडे खत टंचाईने डोके वरले काढल्याने शेतकऱ्यांची अवस्था विदारक झाली आहे. शासन, प्रशासनाकडून या प्रकाराची दखल घेतली जात नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी राजकीय पक्षांमोर आपले गाऱ्हाणे मांडले. .Fertilizer Overpricing : खतांची चढ्या दराने विक्री भोवली.त्याच्या परिणामी काँग्रेसकडून कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतरच्या काळात एमआयएम पक्षाकडून देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत खताची उपलब्धता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र या समस्येचे समाधान शोधताना कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. .युरियाच्या उपलब्धतेचा प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहता कृषी विभागाने गैरप्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या कृषी केंद्राची झाडाझडती घेण्यावर भर दिला आहे. जिल्हयात ७०० ते ७५० कृषी सेवा केंद्रधारक आहेत. सद्या यातील २७ खत विक्रेत्यांविरोधात कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. त्यांना खत विक्रीतील अनागोंदी प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून खुलासा व सुनावणीनंतर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावीत केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..Fertilizer Supply : मंजूर साठ्यापेक्षा ५ हजार टन कमी खतांचा पुरवठा .वाहतूक खर्चात होते वाढगडचिरोली जिल्हयात रेल्वे मार्ग नाही. परिणामी वडसा येथेच रेल्वे रेकच्या माध्यमातून खताचा पुरवठा होतो. त्यानंतर रस्ते मार्गाद्वारेच दुर्गम व नक्षलप्रवण सिरोंचा, गडचिरोली व इतर तालुक्यांमध्ये खत पोहचवावे लागते. यात वाहतूक खर्चात वाढ होत असल्याने वाहतूकदार अनुत्सुक असतात..दुर्गम जिल्ह्यात खताचा पुरवठा होण्यात अडचणी आहेत. या समस्यांवर मात करीत खत पुरवठा करण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु काही कृषी केंद्रधारकाच्या गैरप्रकारामुळे शेतकऱ्यांना खत मिळण्यात अडचणी येतात. ही बाब गांभीर्याने घेत तपासणी व कारवाईवर भर दिला आहे. प्रीती हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली..सिरोंचा तालुक्याची सीमा तेलंगण राज्याशी जोडलेली आहे. त्या भागातील शेतकरी सीमेलगतच्या भागात करारावर शेती घेऊन मिरची आणि कपाशीची लागवड करतात. त्यामुळे त्यांना खताची विक्री होते. परिणामी खत विक्री गैरप्रकार केला असे म्हणणे चुकीचे आहे.- गणेश फाफट, अध्यक्ष, ॲग्रो डीलर असोसिएशन, गडचिरोली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.