Chandrapur News : राजुरा तालुक्यात खत विक्रीतील अनियमितेबाबतच्या तक्रारीनंतर राजुरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने धडक मोहीम राबवीत चार कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले कृषी विभागाचे या कारवाईमुळे -निविष्ठावितरणात गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. .कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले यांनी ही कारवाई केली. या कारवाईतून कृषी सेवा केंद्र चालकांनी खत विकताना नेमकी कशी हेराफेरी केली हे समोर आले. मकपल्ले यांनी आपल्या तपासणी मोहिमेत आठ खत विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. .या दुकानांमध्ये ई पास यंत्रातील साठा, प्रत्यक्ष गोदामातील साठ्यात लक्षणीय तफावत आढळून आली. त्यामुळे नियमभंग केल्याच्या कारणावरून या दुकानांना तत्काळ नोटीस बजावण्यात आली होती. .Krishi Seva Kendra Bbhandara : भंडारा जिल्ह्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित.त्यानंतर परवाना अधिकारी जिल्हा अधीक्षक चंद्रपूर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये एकूण चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आणि चार कृषी सेवा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली.तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईमुळे खत विक्रीत हेराफेरी करणाऱ्या कृषी केंद्र संचालकांचे धाबे दणाणले आहे..Krishi Seva Kendra : आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित.शेतकऱ्यांना खत देण्यास टाळाटाळसध्या शिवारातील पिकांना खताची गरज आहे. त्यामुळे सर्वदूर मागणी वाढली असताना शेतकऱ्यांना मात्र खत उपलब्धतेसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. साठा नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना खत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. .त्यामुळे कृषी विभागाकडे तक्रारी वाढल्या आहेत. लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात देखील निविष्ठा वितरणातील गैरप्रकाराची दखल घेत दहा कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.