Agriculture Impact: ऐन खरिपातच रासायनिक खतांच्या २५ ते ३० टक्क्यांपर्यंत झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बियाणे, कीडनाशके, डिझेल आणि मजुरीचे वाढते दर यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता खतांच्या वाढीव किमतींचे संकट उभे ठाकले आहे. परिणामी यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादन खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..जिल्ह्यात सध्या कापूस, सोयाबीन, तूर, मका तसेच भाजीपाला पिकांच्या लागवडीची तयारी सुरू आहे. या पिकांसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. मात्र यंदा डीएपी व युरियाचे दर स्थिर असले तरी १०:२६:२६, २०:२०:०:१३, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी), एमओपी (पोटॅश) आणि विविध एनपीके मिश्र खतांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. काही खतांच्या पोत्यामागे ४०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगितले. .Fertilizer Prices Increase: रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ.रशिया, चीन, सौदी अरेबिया आदी देशांतून आयात होणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम भारतीय खत बाजारावर झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत खत उत्पादक कंपन्यांनीही दरवाढ केली असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. खतांच्या वाढीव किमतीमुळे अनेक शेतकरी खतांचा वापर कमी करण्याच्या विचारात आहेत. मात्र संतुलित खत व्यवस्थापन बिघडल्यास उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील कृषी केंद्रांवर खत खरेदीसाठी गर्दी वाढत असून काही ठिकाणी कृत्रिम तुटवड्याची शक्यताही वर्तविली जात आहे..शासनाने खतांवरील अनुदान वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे..Fertilizers Price Hike: वाढत्या खत किमतीविरोधात काँग्रेसचे आंदोलन.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खतांच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नॅनो डीएपी, नॅनो युरिया आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. वाढलेल्या दरांमुळे शेतकरी तसेच कृषी केंद्र चालक दोघांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.- आरिफ पठाण, संचालक, सागर अॅग्रो एजन्सीज, आर्णी.जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या किमती वाढल्या आहेत. डीएपी व युरियाच्या दरात वाढ नसली तरी इतर खतांच्या किमती ३० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. शेतकऱ्यांनी नॅनो डीएपी व नॅनो युरियाचा वापर करून खर्चात बचत करावी.- गजानन बुक्कावार, संचालक, गजानन कृषी केंद्र, आर्णी.गत वर्षी माझ्या शेतात ३० पोती खतांचा वापर केला होता. मात्र यंदा वाढलेल्या दरांमुळे १० ते १२ पोत्यांपर्यंतच वापर करणे शक्य होईल. खतांचा वापर कमी केल्यास उत्पादनात घट होणार असून त्याचा परिणाम उत्पन्नावर होईल.- सतीश देशमुख, शेतकरी, येरमळ हेटी, ता. आर्णी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.