Fertilizer Linking System: शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात आहे. त्यातच १ एप्रिलपासून खतांच्या दरात झालेल्या भरमसाट वाढीमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत प्रति बॅग १२५ ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने खतांची दरवाढ मागे घ्यावी आणि खत विक्रीतील ‘लिंकिंग’ची सक्ती तत्काळ थांबवावी, अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी केली आहे..खासदार भगरे यांनी केंद्रीय रसायन व खतमंत्री जगतप्रकाश नड्डा यांना पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की १०:२६:२६, १२:३२:१६, २०:२०:०:१३ यांसारख्या प्रमुख खतांच्या दरवाढीचा थेट फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसत आहे. एकीकडे खतांच्या किमती वाढत असतानाच, दुसरीकडे खत विक्री करताना शेतकऱ्यांना अनावश्यक उत्पादने खरेदी करण्याची (लिंकिंग) सक्ती केली जात आहे. .Fertilizer Price Issue: नायगावमध्ये रासायनिक खतांची अधिकच्या दराने विक्री .विशेष म्हणजे, ग्रामीण भागाचा कणा असलेल्या सहकारी संस्थांवरही ही लिंकिंगची सक्ती लादली जात असल्याने खत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता उरलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून, सरकारने यावर तत्काळ प्रतिबंध घालावा, अशी मागणी त्यांनी केली..Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?.नाशिक जिल्ह्यासह राज्यात अलीकडेच झालेल्या गारपीट आणि पूर्वमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आधीच कोलमडला असताना खतांच्या वाढलेल्या किमती आणि संभाव्य खतटंचाई यामुळे तो अधिकच हवालदिल झाला आहे. खासदार भगरे यांनी केंद्र सरकारकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. .यामध्ये खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करून दर कमी करणे, शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी खतांवरील अनुदानात वाढ करणे, लिंकिंगची सक्ती करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आणि आगामी हंगामासाठी खतांचा पुरवठा सुरळीत ठेवणे यांचा समावेश आहे. तसेच नैसर्गिक आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे..शेतकरी हा देशाचा कणा असून त्याचे आर्थिक संरक्षण करणे सरकारचे कर्तव्य आहे. केंद्राने या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा द्यावा.- भास्कर भगरे, खासदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.