Rabi Season: बुलडाणा जिल्ह्यात रब्बीत हरभरा, मका क्षेत्रांत होणार वाढ
Maize Farming: यंदाच्या रब्बी हंगामासाठी हवामान अनुकूल झाल्याने शेतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. कृषी विभागाने सुमारे ३.८७ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले असून हरभरा आणि मका या पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.