Smart Agriculture: शेती व्यवस्थापनात होतील आमूलाग्र बदल
Digital Farmer: शेती ही मानवजातीची सर्वांत जुनी क्रिया असली तरी पुढील तीन दशकांत ती संपूर्णपणे बदलणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर तंत्रज्ञान आणि हवामानातील बदल यांच्या परिणामामुळे शेतकरी ‘कृषी उद्योजक’ किंवा ‘अॅग्रो टेक्नोक्रॅट’ बनणार असून, त्याच्या दैनंदिन शेती पद्धतीत क्रांतिकारी बदल घडणार आहेत.