Chhatrapati Sambhajinagar News: ‘‘ पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून घेतल्यावर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी केली. या मागणीचे आपल्याला स्वप्न पडले नव्हते. शेतकऱ्यांची ती अपेक्षा होती. शेतकरी शासनाने घोषित केलेल्या मदतीवर समाधानी नाही, म्हणून तो रस्त्यावर उतरला आहे. परंतु ५० खोके घेणाऱ्यांकडे तो हेक्टरी ५० हजार मागतो आहे. पण ते मदत देणार नाहीत, त्यासाठी शेतकऱ्यांना हाती आसूड घ्यावा लागेल,’’ असा घणाघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला..श्री. ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने शनिवारी (ता.११) छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक ते गुलमंडी दरम्यान शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नावर हंबरडा मोर्चाचे आयोजन केले होते. त्या वेळी श्री. ठाकरे बोलत होते. मंचावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते अनिल परब, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील उपस्थित होते..Farmer Compensation Demand: प्रति हेक्टरी ७० हजारांची भरपाई द्यावी.ही मदत म्हणजे इतिहासातील सर्वांत मोठी थापश्री. ठाकरे म्हणाले, ‘‘शासनाने जाहीर केलेली नैसर्गिक आपत्तीची मदत म्हणजे इतिहासातील सर्वांत मोठी थाप आहे. अलीकडे पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन गेले मात्र त्यांच्या एकाही भाषणात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा उल्लेख नाही. त्यांना कळवळा असता तर असे झाले असते का? शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली, मग ते रब्बी पीक घेणार तरी कसे? मदतीच्या घोषणेत जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मनरेगातून तीन लाख रुपये जाहीर केले आहेत. त्यातील एक लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचे आव्हानही श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले..ते म्हणाले, की मदत मागणाऱ्या शेतकऱ्यांना राजकारण करू नका असे म्हटले जाते. राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची मदत पाहिजे. मग ते संकटात असताना मदत करायला नको का? विम्याचा हप्ता कचकाटून घेतला जातो, भरपाई मात्र मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या कोंबडीला १०० रुपये, दुभत्या गाईला ३७ हजार सरकार देणार म्हणे. ही मदत खरीच पुरेशी आहेत का, असा सवाल त्यांनी केला. श्री. ठाकरे यांच्या भाषणाआधी दोन शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या..Farmer Demand: शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड.‘महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यातही दहा हजार टाका...’श्री ठाकरे म्हणाले, की बिहारची निवडणूक असल्याने बिहारमधील महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये टाकले. त्यांना पैसे देण्याबाबत आमचे दुमत नाही, पण केंद्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यातही दहा हजार रुपये टाकायला पाहिजे..प्रशासनाने खर्डेघाशी करू नये...श्री. ठाकरे म्हणाले, की प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांचीच लेकरेच आहेत. त्यांनी खर्डेघाशी करू नये. आजच्या मोर्चानंतर शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने गावागावांत जाऊन प्रत्येक कार्यालयात ठाण मांडून पॅकेजची अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवावे. जाहीर केलेले पॅकेज दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळत नसेल तर जाब विचारावा, अशा सूचना त्यांनी पक्षाच्या आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांना केल्या..मजबूत सरकार विरोधी पक्षनेता नेमेना...विरोधी पक्षनेत्याच्या रिक्तपदाबाबत श्री. ठाकरे म्हणाले, की राज्यात, देशात डबल इंजिनचे मजबूत सरकार आहे असे म्हणतात. परंतु विरोधी पक्षनेता नेमायला घाबरतात. असंवैधानिक पद्धतीने दोन उपमुख्यमंत्री यांनी बसविले आहेत, ते यांना कसे चालतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.