Ahilyanagar News : शेतीमालाला भाव द्या; अन्यथा लढा उभारू, असा इशारा देऊन स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीच्या प्रतिनिधींच्या वतीने आमदार हेमंत ओगले यांना निवेदन देण्यात आले. .या निवेदनात श्रीरामपूर तालुक्यात शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत आणि बाजार समितीत बंद केलेला मोकळा कांदा बाजार तातडीने पुन्हा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली..Onion Farmers Protest: कानगाव येथे कांदा उत्पादकांचे बेमुदत धरणे.शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की केंद्र सरकारने कापूस, सोयाबीन, मका, तूर यांची अनावश्यक आयात केल्यामुळे बाजारात भाव कोसळले असून, शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या एमएसपी एवढाही दर मिळत नाही. उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत..कांदा पिकाचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल १८०० रुपये असताना फक्त ८०० रुपये भाव मिळतो आहे. त्यामुळे कांद्याला किमान १५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली, तसेच ७ ऑगस्टपासून श्रीरामपूर बाजार समितीत मोकळा कांदा बाजार बेकायदा बंद करण्यात आला आहे. .Onion Farmers : कांदा उत्पादकांना हेक्टरी ५० हजारांची मदत; आंध्र सरकारचा मोठा निर्णय.गोणीत कांदा आणण्याची सक्ती केली जात असून, यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये खर्च येतो. या तुलनेत मोकळ्या कांद्याचा खर्च नगण्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार ओगले यांनी संचालक मंडळाला आदेश देऊन मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी संघटनांनी केली..जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, सुनीता वानखेडे, प्रकाश जाधव, कोमल वानखेडे, शीतल पोकळे, आशा महांकाळे, मंदा गमे, सुनंदा चोरमल, सुनीता अमोलिक, पुष्पा घोगरे, मयूर भनगडे, अशोक आव्हाड, मधुकर काकड, श्रीराम त्रिवेदी, बाळासाहेब घोगरे, जगदीश खरात, बाबासाहेब गायकवाड, अंबादास गमे, अर्जुन दातीर आदीं उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.