Land Acquisition Process: ‘‘पूर्वीच्या आराखड्यात डीपी आणि टीपी रोड अस्तित्वात असताना, नव्याने रिंग रोडचा घाट कशासाठी?’’असा सवाल करत बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुपीक शेती जमीन संपुष्टात आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत, योग्य पुनर्वसन आणि संमतीशिवाय जमीन संपादन केल्यास आगामी पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे..शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळावा या मागणीसाठी मंगळवारी (ता. १६) सकाळी १० वाजता गौळाणे फाटा येथे महामार्गावर जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर आणि कैलास खांडबहाले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी सरकार आणि जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली..Farmer Protest: ‘महावितरण’ विरोधात शेतकरी एकवटले.आंदोलनादरम्यान पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.मागण्या मान्य न झाल्यास थेट विधानभवनावर धडक देण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे..Land Acquisition: शेती परत द्या, नाहीतर आम्हाला मारून टाका.आंदोलनातील मुख्य मुद्दे आणि मागण्या:शेतकऱ्यांची कोणतीही लेखी संमती न घेता प्रशासन जबरदस्तीने भूसंपादनाची प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. भूसंपादनाच्या मोबदल्यात प्रचंड तफावत असल्याने अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत..सर्वांना एकसमान व न्याय्य मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली. रिंग रोड प्रकल्पाFarmer Protestत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा संशय असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.