Nagpur Agriculture News: पावसाअभावी पेरण्यांचा वेग मंदावला
Delayed Monsoon: मॉन्सूनच्या उशिरा आगमनासह अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने नागपूर जिल्ह्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला आहे. जिल्ह्यात नियोजित ४ लाख ७२ हजार ८९६.२२ हेक्टरपैकी शुक्रवार (ता. २७ जून) अखेर केवळ ३६ हजार ७५२.५९ हेक्टर, म्हणजेच सुमारे आठ टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.