Satara News : वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे हैराण झालेले या विभागातील शेतकरी गवे, रानडुक्करे आणि वानरांच्या तावडीतून पिके वाचविण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. डबे व फटाके वाजविणे, बुजगावणे उभी करणे, वेगवेगळे आवाज काढणारे स्पीकर बसविणे आदी उपायांबरोबरच आता त्यांनी पिकात वाघाचे कटाउट लावायला सुरुवात केली असून त्याचा परिणामही चांगला मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत..वन्यप्राण्यांकडून शेतीचे होणारे अतोनात नुकसान ही गेल्या काही वर्षांतील या परिसरातील मोठी समस्या बनली असून बहुतांश शेतकरी कुटुंबे त्यामुळे हैराण आहेत गवे, रानडुक्करे आणि वानरांचे कळपच शिवारांच्या परिसरात वास्तव्यास असल्याने शेतात पीक उभे असले तरीही मळणी करून धान्य घरी येईलच याचीही शाश्वती शेतकऱ्यांना वाटत नाही. .Wild Animal Crop Damage : खानदेशात पिकांत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ.डोंगर पट्ट्यात उपद्रव अधिकच असल्याने तेथील अनेक शेतकऱ्यांनी शेती पाडून ठेवली आहे. घातलेला खर्चही निघत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंबांनी पोटापाण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला असून काहीजण सपाटीच्या गावात शेतमजुरीला जात आहेत. डोंगरातील शेती पडून असल्याने वन्यप्राण्यांनी सपाटीच्या गावांकडे मोर्चा वळविला असून तेथील शेतकरीही उपद्रवाने रडकुंडीला आले आहेत..Wild Animal Crop Damage : पाडलोसमध्ये आंबा, काजू, नारळाचे गव्यांकडून नुकसान.विविध उपायाबरोबरच त्यांनी पिकात वाघाचे कटाउट लावायला सुरुवात केली आहे.खास बनवून आणलेली वाघाचीही विविध ॲक्शनमधील कटाउट शिवरातून ये-जा करणाऱ्यांसह प्राण्यांनाही अचानक घाबरवून टाकत आहेत..विविध प्रकारची फळझाडे असलेल्या बागा, शिवारे आणि घरांच्या परिसरात वानरांचे कळपच्या कळप वास्तव्याला असून त्यांना पळवून लावण्यासाठी काहींनी चक्क व्यवसाय व घरांच्या ठिकाणी भिंतीवर हुबेहूब भासवीत अशी बिबट्याची चित्रे काढण्याची अनोखी शक्कलही लढविली आहे. .स्थानिक चित्रकारांच्या मदतीने अशी चित्रे काढण्यात येत आहेत.परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे.शिवारात वानरेही त्याचा अनुभव घेत असल्याने खरा असो की चित्रातला, बिबट्याला बघून वानरे धूम ठोकत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.