Farmer Participation: एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांच्या संभाव्य नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आर्थिक सुरक्षिततेसाठी पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे..महाराष्ट्र शासनामार्फत उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रब्बी मका, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या सात पिकांचा समावेश करण्यात आला आहे..Rabi Crop Insurance : कोल्हापूर जिल्ह्यासाठी रब्बी पीकविमा योजनेची घोषणा.योजनेत सहभागी होण्यासाठी रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) पिकासाठी ३० नोव्हेंबर २०२६, गहू (बागायत), हरभरा, रब्बी मका व रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२६, तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी ३१ मार्च २०२७ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे..Rabi Crop Insurance : पीक नुकसानीची चिंता सोडा! रब्बी पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे डॉ. जाधवांचे आवाहन.शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या संकेतस्थळावर स्वतः नोंदणी करता येईल. तसेच बँका, विमा कंपन्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी, पीक विमा अर्ज आणि सामूहिक सेवा केंद्रांमार्फतही सहभाग नोंदविता येईल. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी संबंधित बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे..जिल्ह्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकर्यांनी विहित मुदतीत पीक विमा नोंदणी करून आपल्या पिकांना विमा संरक्षण द्यावे, असे आवाहन दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.