Nashik News : जाती-धर्माच्या नावाने आपण एकमेकांशी भिडत आहोत, मात्र सरकारशी लढत नाही. आपण सर्वजण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही, हिच मोठी शोकांतिका आहे. नेतेमंडळी किंवा राजकीय पदाधिकारी विविध ठिकाणी एकत्र येतात; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोणी एकत्र येत नाही, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच नागपूर आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले..बागलाण तालुका प्रहार जनशक्ती जनशक्ती पक्ष आयोजित ‘शेतकरी हक्क यात्रा’ शनिवारी (ता. ४) किकवारी खुर्द (ता. बागलाण) येथे दाखल झाली. या प्रसंगी सभा पार पडली. या वेळी श्री. कडू यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. या प्रसंगी प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, दीपक काकुळते, माजी सभापती संजय सोनवणे, राज्य कांदा उत्पादक संघटनेचे सुभाष शिंदे, दीपक पगार, पंकज ठाकरे, अनिल पाटील, डॉ. राहुल सोनवणे, व्यंग्यचित्रकार किरण मोरे, देविदास अहिरे, केदा भामरे, रोहिदास भामरे, केशव मांडवडे आदींसह परिसरातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..Farmers Protest: आश्वासन पाळा, अन्यथा मंत्र्यांना अडवू.श्री. कडू म्हणाले, की शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा थांबणार नाही. माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल झाले तरी मी मागे हटणार नाही. ही माझ्या पक्षाची नव्हे, तर वेदनेची सभा आहे. नाशिकमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात पिकतो पण सरकार शेतकऱ्याला जगू देण्यासाठी तयार नाही. कांदा उत्पादक शेतकरी मरत आहेत, तरीही कॅबिनेटने आजवर एकही बैठक घेतली नाही. .Farmer Protest: करमोडीतील शेतकऱ्यांनी नाकारली शासनाची मदत.शेतकऱ्यांच्या जिवावर आपली राजकीय पोळी भाजणारे आमदार-खासदार आज पगारवाढीचा लाभ घेत आहेत. आमदारांचे मानधन तीन लाख ५० हजार रुपये झाले, खासदारांचाही पगार वाढला; पण शेतकऱ्याला हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा गरीब आमदार-खासदार आहेत, अशी उपरोधिक टीका श्री. कडू यांनी केली....तर मुख्यमंत्र्यांना नागपूरबाहेर पडू देणार नाहीशेतकरी कर्जमाफी, पिकांची नुकसानभरपाई आणि हमीभावाच्या मागण्यांसाठी २८ ऑक्टोबरला नागपूरला मोर्चा निघणार आहे. त्यावेळी सगळ्यांनी ट्रॅक्टरसह नागपूर गाठा. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांच्या नागपुरातून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा श्री. कडू यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.