Dharashiv Water Campaign: शिराढोणच्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ‘जलतारा’ उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या प्रेरणेने राज्य शासनाच्या जलसंवर्धन अभियानांतर्गत जिल्ह्यात ‘जलतारा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे..नाम फाउंडेशन व नॅचरल शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १८) नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रातील रांजणी येथे ‘जलतारा’ या जलसंधारण उपक्रमाचा प्रारंभ तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या हस्ते झाला. यावेळी नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे उपस्थित होते. कार्यक्रमास संचालक पांडूरंग आवाड, संभाजी रेड्डी, विष्णू मोहिते, दिलीपराव भिसे, मनोज पालकर आदी उपस्थित होते..Jaltara Works: धाराशिवमध्ये एक लाख जलताराचा निर्धार.तहसीलदार ढोकले म्हणाले, ‘‘नॅचरल शुगरचे सामाजिक व जलसंधारण क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. यापूर्वीही संस्थेने केलेली जलसंधारणाची कामे पथदर्शी ठरली आहेत. शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने नाम फाउंडेशन व नॅचरल उद्योग समूहाच्या सहकार्याने ‘जलतारा’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी जेसीबी नाम फाउंडेशनकडून उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यासाठी लागणारे डिझेल नॅचरल शुगरतर्फे पुरविण्यात येणार आहे. खड्ड्यांमध्ये दगड टाकून ते भरून घेण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची राहणार आहे.’’.Environmental Conservation: पर्यावरण संतुलन साधणारे ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन .ठोंबरे म्हणाले, ‘‘नॅचरल उद्योग समूह सामाजिक कार्य आणि जलसंधारण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार धाराशिव जिल्ह्यात ‘जलतारा’ उपक्रम राबविण्याचा पहिला मान नॅचरल शुगरला मिळाला आहे. आपल्या शेतातील पावसाचे शंभर टक्के पाणी शेतातच मुरविण्याच्या दृष्टीने ‘जलतारा’ हा जलसंधारण प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे..नॅचरल उद्योगामार्फत जलसंधारणाच्या तिसऱ्या संकल्पनेची सुरुवात आज करण्यात आली आहे. यापूर्वी नॅचरल शुगरने समतल पाझर कालवे, नाला खोलीकरण व रुंदीकरण अशी विविध जलसंधारणाची कामे केली आहेत. कारखान्याच्या शेती विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत असून, कार्यक्षेत्रात किमान दहा हजार खड्डे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.