Amaravati News : खरिपातील सोयाबीन पीक बुडाल्याने शेतकऱ्यांना आता कापूस व तुरीच्या पिकापासून अपेक्षा आहेत. ही दोन्ही पिके हाती येण्यास अवकाश असल्याने व पिकांची स्थिती सोयाबीनच्या तुलनेत बरी असल्याने यातून मिळणाऱ्या मिळकतीवर शेतकऱ्यांची मदार अवलंबून आहे. .जुलै व ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि सप्टेंबरमधील सततच्या पावसाने सोयाबीनची पुरती वाताहत झाली आहे. हाती येऊ शकणारे पीक गेले. उत्पादनाची सरासरी दोन ते तीन क्विंटलपर्यंत घटली. .खुल्या बाजारात एक हजार ४०० रुपये हमीदरापेक्षा कमी दर मिळत आहेत. शासकीय खरेदी केंद्रांचा अद्याप मुहूर्त निघालेला नाही. त्यामुळे सोयाबीनपासून लागवड खर्चही निघेल, असे उत्पन्न हाती येणार नसल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम कापूस व तुरीवर अवलंबून आहे..कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी सोयाबीन सोबत कापूस आणि तुरीची लागवड करतात. तूर हे आंतरपीक असले तरी या पिकाचे पेरणीक्षेत्र वाढले आहे. काही शेतकरी कापूस व तुरीची तर सोयाबीनसोबत तुरीची पेरणी करणारेही शेतकरी आहेत..Crop Damage : जुन्नरमध्ये द्राक्ष बागांचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान.ही दोन्ही पिके नगदी पीक म्हणून गणली जातात. तूर व कापसाला हमीदरही चांगले असून उत्पादनाची सरासरीही शेतकऱ्यांना परवडणारी असल्याने या दोन्ही पिकांपासून आशा वाढल्या आहेत. २०२५ च्या खरीप हंगामासाठी केंद्राने मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार ७१० रुपये प्रतिक्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाला आठ हजार ११० रुपये हमीदर जाहीर केला आहे..तर तुरीला आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. कापसाचे पीक आता हाती येणार आहे. यंदा सीसीआय कापसाची हमीदराने खरेदी करणार आहे, तर तुरीचे पीक हाती येण्यास अद्याप बराच अवकाश आहे. दोन्ही पिकांची स्थिती सोयाबीनच्या तुलनेत चांगली असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे..Crop Damage: शेतात पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचे मोठे नुकसान.‘सीसीआयची केंद्रे सुरू झालीच नाहीत’यंदा सीसीआयमार्फेत हमीदराने कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १४ केंद्रे १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार होती. विक्रीसाठी शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य असून ३१ ऑक्टोबरपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. अद्याप जिल्ह्यात एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नसून सीसीआयकडून कोणत्याच प्रकारची माहिती दिली जात नाही..जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचा तडाखा सहन करून कापूस व तूर आता सावरू लागली आहे. ऑक्टोबर हिटमुळे वाढलेल्या उष्म्याने जमिनीतील ओलावा कमी होऊन कडक होऊ लागली आहे. कपाशीला बोंडी लागली असून ती अधिक परिपक्व होण्यासाठी एका पाण्याची गरज आहे.- अनिल काकडे, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.