Cow Dung : राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने अर्थात एनडीडीबीने (NDDB) एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे गावांमधील शेणाचे ढिगारे कमी होतील. तसेच याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल. एनडीडीबी देशातील ६ राज्यांत १५ बायोगॅस प्लांट्सची उभारणी करत आहे. यात गुजरात, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा आणि बिहारचा समावेश आहे..या कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्लांट्सचा खर्च ७५० कोटी आहे. विशेष या उपक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कारण यासाठी लागणारे शेण शेतकऱ्यांकडून प्रति किलो १ रुपये दराने खरेदी केले जाणार आहे. या प्लांट्ससाठी दररोज १,५०० टनांपेक्षा अधिक गाईच्या शेणाची गरज लागणार आहे..Cow Dung : जनावरांच्या दुधातूनच नाही तर शेणातूही कमवा पैसा .या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेचा प्रश्न मिटणार आहे. तसेच शेणाच्या ढिगाऱ्यांमुळे निर्माण होणारी दुर्गंधी कमी करणे आणि पशुपालकांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळवून देणे या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे स्वच्छ ऊर्जा निर्मिती होईल आणि शाश्वत ग्रामीण विकासालादेखील प्रोत्साहन मिळेल. याबाबतचे वृत्त बिझनेसलाइनने दिले आहे.."सध्या शेतकऱ्यांकडून सुमारे ३०० ते ४०० टन शेणाची खरेदी केली जात आहे. सध्या कार्यरत असलेल्या बायोगॅस प्लांटसाठी खरेदी केलेल्या शेणासाठी प्रति किलो १ रुपयांपर्यंत पैसे दिले जातात. आता आणखी १५ प्लांट्सची उभारणी केली जात आहे. ज्याचे बांधकाम सुरु आहे. या प्रत्येक प्लांटची दररोजची क्षमता १०० टनाची (शेण) असेल आणि प्रत्येक प्लांटचा खर्च सुमारे ५० कोटी रुपये असेल," असे एनडीडीबीचे अध्यक्ष मनीष शाह यांनी सांगितले..Cow Dung Tractor : गाईच्या शेणावरही चालेल ट्रॅक्टर .बनास डेअरी ही गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) अंतर्गत असलेल्या सहकारी दूध संघांचा एक भाग आहे. बनासकांठा जिल्ह्यात पहिल्यांदा बायोगॅस प्लांट उभारण्यात आला. यात गाईच्या शेणाचे आणि बटाट्याचे अवशेषाचे रूपांतर बायो-सीएनजी, अपारंपरिक ऊर्जा इंधनात केले जाते. तसेच एनडीडीबी, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनची भारतीय उपकंपनी सुझुकी आर अँड डी सेंटर इंडिया आणि बनास डेअरी यांच्यात बनासकांठा जिल्ह्यात कॉम्प्रेस्ड बायोमिथेन गॅसच्या निर्मितीसाठी शेणापासून चार बायोगॅस प्लांट उभारण्यासाठी त्रिपक्षीय करार झाला आहे. सध्या या प्लांट्सची उभारणी सुरु आहे..एनडीडीबीने उत्तर प्रदेशच्या वाराणसी बायोगॅस प्लांटदेखील उभारला आहे. याची क्षमता १०० टन आहे. दूध संकलनाप्रमाणे, गुजरातमधील बनासकांठा आणि उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन दररोज सकाळी गाईचे शेण गोळा करण्यात येते. हे शेण सध्या कार्यरत असलेल्या प्लांटला पुरवले जाते. यातून दररोज सुमारे ४ हजार ते ५ हजार क्युबिक मीटर बायोगॅसची निर्मिती केली जात आहे..महाराष्ट्रातील महानंदा डेअरीसोबत करारबनास डेअरी व्यतिरिक्त, एनडीडीबीने गुजरातमधील अमूल डेअरी, दूधसागर डेअरी, बडोदा डेअरी आणि साबर डेअरीसोबत अशाप्रकारचे आठ बायोगॅस प्लांट उभारण्यासाठी करार केले आहेत. एनडीडीबीने गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, महाराष्ट्रातील महानंदा डेअरी, राजस्थान सहकारी दूध संघ, ओडिशा राज्य सहकारी दूध उत्पादक संघ आणि बिहारमधील बरौनी डेअरी यांच्याशी करार केले आहेत., असे शाह यांनी पुढे सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.