Wardha News: वर्धा जिल्ह्यात हमीभावाने कापूस खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र ‘सीसीआय’ने अटी, नियमांची मोठी यादी दिल्याने त्याची पूर्तता करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे ‘सीसीआय’ केंद्रांवर आतापर्यंत केवळ शंभर क्विंटल कापसाची आवक होऊ शकली. याउलट व्यापाऱ्यांकडील कापूस खरेदी ३४००० क्विंटल वर पोहोचली आहे. .संततधार पावसाचा फटका बसत कापसावर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे कापसाची उत्पादकता यंदा घटली आहे. त्यातच खुल्या बाजारात कापसाचे दर सात हजार रुपयांवर स्थिरावले आहेत. या उलट केंद्र सरकारने ८११० रुपयांचा हमीभाव कापसाला जाहीर केला आहे. परिणामी शेतकऱ्यांना हमीभावाने कापसाच्या विक्रीसाठी ‘सीसीआय’ केंद्रांची प्रतीक्षा होती..मात्र या वर्षीच्या हंगामात कापूस विक्रीसाठी ओलावा आणि कचऱ्याच्या प्रमाणासोबतच नोंदणी करिता कपास किसान ॲपची सक्ती केली आहे. ॲपवर नोंदणीसाठी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असल्याने शेतकऱ्यांची यामध्ये चांगलीच दमछाक होत आहे. परिणामी, ‘सीसीआय’च्या केंद्रांवर कापूस आवक अत्यल्प होत असून या उलट खुल्या बाजारात व्यापाऱ्यांना कापूस देण्यावर शेतकऱ्यांचा भर वाढला आहे..Cotton Procurement: ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्रांवर निगरणी समित्या स्थापन .वर्धा जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस व्यापाऱ्यांना विकला. यामुळे व्यापाऱ्यांची खरेदी ३४ हजार २२७ क्विंटलवर पोहोचली. तर ‘सीसीआय’ची खरेदी केवळ शंभर क्विंटरवर थांबली आहे. शेतकऱ्यांचा कापूस घेण्याची तयारी दाखवायची पण त्यात अटी नियमांचा खोडा टाकायचा ही ‘सीसीआय’ची जुनी कार्यपद्धती आहे, असा आरोप या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधून होत आहे. विशेष म्हणजे ‘सीसीआय’ला कापूस देण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आली..त्यानुसार आवश्यक कागदपत्र सादर करण्यात आले. तिथून आलेल्या संदेशानुसार शेतकऱ्यांकडून ‘सीसीआय’च्या केंद्रावर कापूस नेण्यात आला. मात्र तिथे असलेल्या ग्रेडरकडून कापसाच्या ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांचा कापूस नाकारला जात आहे. परंतु कापूस विक्रीसाठी बाजारात आणल्याने परत नेल्यास वाहतुकीवर आणखी खर्च होईल यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना आपला कापूस देऊन मोकळे होत आहेत. येथे सात ते साडेसात हजार रुपये क्विंटलच्या दराने त्यांना कापूस विकावा लागत आहे..Cotton Procurement: ‘सीसीआय’च्या खरेदीअभावी शेतकऱ्यांचे शोषण .मंजूर १३, प्रत्यक्षात दोनच खरेदी केंद्रे सुरूकापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता ‘सीसीआय’कडून १३ केंद्रे मंजूर करण्यात आले. १३ केंद्रे मंजूर असले तरी खरेदी केवळ दोनच केंद्रांच्या माध्यमातून होत आहे. ‘सीसीआय’च्या नियमांची शर्यत पार करण्यात जिल्ह्यातील केवळ पाच शेतकरी पास झाले असून, त्यांच्याकडून हमीदरात १००.२१ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. इतर ठिकाणची केंद्रे केव्हा सुरू होतील, असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कायम आहे.- ‘सीसीआय’कडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या : २६,३९५- बाजार समितीने मंजुरी दिलेली शेतकरी संख्या : १९६३.झालेली कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)तालुका--सीसीआय--व्यापारीहिंगणघाट १६.४५-- ९,०५३.९८वर्धा ०० --६९७७.२५आर्वी ०० --३६८२.३२पुलगाव ००-- ४०८७.०९समुद्रपूर ६८.०३-- ९१४१.६०सिंदी (रेल्वे) ०० ३२९.७५आष्टी ००-- ९५५.८५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.