Rain Delay in Maharashtra: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भातरोपे संकटात सापडली आहेत. उलट सकाळपासून कडक ऊन पडत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी रोपांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. .दरम्यान, हवामान विभागाने २१ जूनपर्यंत सद्यस्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात ६ जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर दोन-तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस झाला, तर काही भागांत तुरळक सरी कोसळल्या. मात्र, गेल्या सात ते आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. एकीकडे पावसाचा अभाव आणि दुसरीकडे वाढते ऊन यामुळे भातरोपे कोमेजण्याच्या स्थितीत आली आहेत..Paddy Sowing Delay: पाऊस लांबल्यामुळे भात पेरणी रखडली.भातरोपे जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रोपांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, ते शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाने २१ जूनपर्यंत अत्यल्प पावसाचा अंदाज दिल्याने पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, बुधवारी (ता. १७) सकाळपासून जिल्ह्यात कडक ऊन पडले असून, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानातही वाढ झाली आहे..Paddy Farmers Issue: ‘या रोपांसोबत आमच्या आशाही करपून जातील!’; भातपट्ट्यातील शेतकऱ्यांची व्यथा.नागली, भुईमूग पेरणीची घाई टाळाज्या शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार केल्या आहेत त्यांनी रोपांना नियमित पाणी द्यावे तसेच आच्छादनावर भर द्यावा. मान्सूनचे पुढील आठवड्यात पुनरुज्जीवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागली व भुईमूग पिकांची पेरणी करण्याची घाई करू नये, असा सल्ला मुळदे संशोधन केंद्राने दिला आहे..गेल्या वर्षाच्या तुलनेत ८५६.८ मिमी पावसाची तूटजून महिना अर्धा संपला तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. १ जानेवारी ते १६ जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात केवळ १०७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९६४.६ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत ८५६.८ मिमी पावसाची तूट नोंदवली गेली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.