Nagpur News : ओलिताची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी विहिरी खोदून पूर्ण करीत वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केले. मात्र गत सात महिन्यांपासून जिल्ह्यातील ९५४ शेतकऱ्यांचे अर्ज महावितरण कार्यालयात प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हा वीज वितरण कंपनीच्या अहवालातून समोर आली आहे. .शेतकऱ्यांना ओलिताची सोय व्हावी यासाठी शासनाच्या वतीने मनरेगातून योजना राबवीत विहीर खोदकामासाठी अनुदान दिले जाते. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेत विहिरीचे काम पूर्ण केले आहे. .Agriculture Electricity : शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरू नये.या शेतकऱ्यांकडून महावितरणकडे वीज जोडणीसाठी अर्ज करीत रीतसर डिमांड भरण्यात आले. डिमांड भरल्यानंतर महिनाभरात वीजपुरवठा देणे आवश्यक असताना सात आठ महिने उलटले तरी अनेक शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे..३१ मार्च २०२४ अखेर जिल्ह्यात १ हजार २३५ कृषिपंप अर्ज प्रलंबित (पेड पेंडिंग) होते. २०२४-२५ मध्ये नवीन ५२९ अर्ज प्राप्त झाले, तर यावर्षी ८१० शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात आले. तरी, वर्षअखेरीस ९५४ शेतकऱ्यांना जोडणी मिळालेली नाही. .यात रामटेक तालुका १३२ प्रलंबित अर्जासह आघाडीवर आहे. त्याच प्रमाणे सावनेर तालुका ९७, नरखेड १२२, मौदा ११५, कुही १०६, काटोल ५७ आणि भिवापूर तालुक्यांमध्ये ९३ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. तर कामठी तालुक्यात सर्व अर्ज निकाली काढण्यात आले असून, तेथे प्रलंबित संख्या शून्य आहे..Agriculture Electricity : खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी त्रस्त.शेतकऱ्यांचे हाल कायमशेतकऱ्यांनी विजेचे बिल आणि मागणी शुल्क भरूनसुद्धा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार सतत होत आहे. वीज जोडणीसाठी आवश्यक साहित्य, ट्रान्सफॉर्मर उपलब्धता आणि मंजुरी प्रक्रियेतील विलंबामुळे काम अडकले असल्याचे सांगण्यात आले..तालुकानिहाय प्रलंबित अर्जनागपूर १९हिंगणा १९काटोल ५७कळमेश्वर ११४नरखेड १२२रामटेक १३२मौदा ११५पारशिवणी ८८उमरेड ४४भिवापूर ९३कुही १०६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.