Dharashiv News: रब्बी हंगामातील पेरणीच्या ऐन धावपळीत कृषी सेवा केंद्रचालकांनी पुकारलेल्या बंदमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार २०० केंद्रांपैकी बहुतांश केंद्रे मंगळवारी (ता.२८) बंद राहिल्याने बियाणे, खते व औषधे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन विस्कळित झाले आहे..बियाणे, खतांअभावी पेरणीची वेळ चुकली, ओलावा घटल्यास नियोजन बिघडून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शहरांसह ग्रामीण भागातील निविष्टा केंद्रे बंद ठेवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्य स्तरावरून पुकारण्यात आलेल्या या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला..Rabi Season: खरिपात हानी, आता रब्बीकडून अपेक्षा.मात्र, शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. बियाणे विक्रीसाठी कृषी सेवा केंद्रचालकांनी साथी पोर्टल दोनचा वापर करावा, यासंबंधीची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. साथी पोर्टल दोनच्या वापरास स्थगिती द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनतर्फे (माफदा) एक दिवस विक्री केंद्रे बंद आंदोलन पुकारण्यात आले..त्यास जिल्ह्यातील कृषी निविष्टा विक्रेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कृषी विभागाकडून मागील एक वर्ष कालावधीपासून बियाणे उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संनियंत्रणासाठी कंपन्या व घाऊक विक्रेते यांच्यासाठी साथी पोर्टल एकचा व किरकोळ विक्रेत्यांसाठी साथी पोर्टल दोनचा वापर करण्याची कार्यवाही सुरू आहे..Rabi Season: बुलडाणा जिल्ह्यात रब्बीत हरभरा, मका क्षेत्रांत होणार वाढ.मात्र, कृषी केंद्रचालकांकडे संगणक संच, प्रिंटर व स्कॅनर नसणे, विक्री केंद्रामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, खरीप व रब्बी हंगामामध्ये कृषी निविष्ठा विक्री करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा असलेला अत्यल्प कालावधी, शेतकऱ्यांकडून बियाणे, खते, कीटकनाशकांची एकाच वेळी होणारी खरेदी आदी कारणांमुळे बियाण्यांची विक्री साथी पोर्टल दोनमधून करणे कठीण आहे. पोर्टल वापराचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके झालेली नाहीत. .या अडचणींमुळे कृषी विभागाचे पोर्टल-२ वापरणे शक्य होणार नाही. तरीही कृषी विभागाकडून पोर्टल-२ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वापर न केल्यास विक्रेत्यांना नोटिसा देणे, विक्री परवाना निलंबित अथवा रद्द करण्यासंदर्भात कार्यवाही केली जात आहे. या कार्यवाहीस तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी माफदाचे जिल्हा सचिव उदय तीर्थकर यांनी केली आहे..दुकानदारांची कामे वाढवून ठेवत आहे. ई-पॉसवर शेतकऱ्यांचे अंगठे मॅच होत नाहीत. पाच-पाच ठिकाणी बिले कशी करायची. त्यासाठी नेट, संगणक, मनुष्यबळ कुठून आणायचे, पोर्टलवर माहिती भरण्यास उशीर लागल्यास तोपर्यंत शेतकरी थांबणार नाही. पेरणी हंगामात होणारी गर्दी पाहता हे काम अशक्य आहे.- अभिजित गिलबिले, कृषी सेवा केंद्रचालक, भूम.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.