Beed News : शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांवर किसान सभा शुक्रवारी (ता. १०) आक्रमक झाली होती. शेतकरी, शेतमजुरांसह थेट परळी तहसील कार्यालयात घुसत मागण्यांबाबत निदर्शने केली. कर्जमाफी द्या, मदत करा नसता खुर्च्या रिकाम्या करा अशी घोषणाबाजी करत सरकारला जाग येणार नसेल पुढच्या वेळी सरकारी कार्यालय ताब्यात घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा किसान सभेने प्रशासनाला दिला. .निवेदनात म्हटले की, यावर्षीचा खरीप हंगाम पूर्णपणे हातचा निघून गेला असून पुढील रब्बीच्या पेरणी करिता शेतच राहिली नाहीत. अशा परिस्थितीत सरकार कडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीत मात्र आकड्याचा खेळ करत अनेक बाबतीत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. .Rain Crop Damage : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीने ४२०४ हेक्टरची हानी.खरवडून गेलेल्या फक्त अल्प आणि अती अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत (२ हेक्टर), आपत्ती मदत मिळण्यासाठी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ अथवा अनुदान घेतलेले नसावे, असे शासन आदेशात स्पष्ट नमूद केले. .याबाबत किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. पी. एस. घाडगे, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. सुदाम शिंदे, कॉ. भगवान बडे आदी शिष्टमंडळाने प्रशासनासोबत चर्चा केली असता किती जिरायती आणि बागायती क्षेत्र तालुक्यात दर्शविलेले आहे. त्यानुसार नुकसान भरपाई मिळणार का? एकदा नुकसानीची मदत मिळाल्यावर दुसऱ्या नुकसानीची मदत मिळणार का? असा प्रश्न केला असता प्रशासन देखील याबाबत निरुत्तर राहिले. .Crop Damage Compensation : अहिल्यानगरच्या तेरा तालुक्यांत नुकसानीपोटी मिळणार मदत.सहकार मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध...शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्ही निवडून येण्यासाठी निवडणूक वचननाम्यात, अशी आश्वासन देतो, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संविधानिक पदावर असलेले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर शेतकऱ्यांप्रति सत्ताधारी सरकार आणि प्रशासन यांची मानसिकता आणि असंवेदनशीलता यातून स्पष्ट दिसून येत असल्याचे सांगत किसान सभा जाहीर निषेध करत, असल्याचे किसान सभा राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे म्हणाले..या आहेत प्रमुख मागण्या...शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्याहंगामी बागायत क्षेत्रासाठी शासनाने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी.किमान ५० टक्के बागायती व ५० टक्के कोरडवाहू हा रेषो तरी मदतीसाठी जपला जावा.खरडून गेलेल्या जमिनीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून रोख एकरी ५० हजार रुपये व त्यानंतर मनरेगातून घोषित केल्याप्रमाणे मदत द्यावी.बुजलेल्या विहिरी उपसण्यासाठी किमान १ लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मदत करावी.पुरामुळे वाहून गेलेल्या वा मृत झालेल्या जनावरांना बाजारभावाप्रमाणे भरपाई अथवा प्रति जनावर ७० हजार रुपये याप्रमाणे भरपाई मिळावी. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.