Nashik News: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ‘नाफेड’कडे सहकारी संस्थांमार्फत १.५ लाख टन कांदा विक्री केला. मात्र गेल्या पाच महिन्यांपूर्वी खरेदीचे २५ टक्के पेमेंट अद्याप मिळाले नाही. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने कांदा विकला. .आता रब्बीसाठी भांडवल नाही. अशा प्रकारे आर्थिक कोंडी झाल्याने थकित कांदा रकमेसाठी चांदवड, नांदगाव, देवळा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी थेट ‘नाफेड’ कार्यालयावर धडक देत दोन तास ठिय्या दिला. या वेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, शेतकरी दादाभाऊ दाभाडे, जनार्दन महाले, नितीन बच्छाव आदींसह १०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते..Onion Price: कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्याने हताश होऊन उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर.गेल्या चार महिन्यांपूर्वी कांद्याचे वजन, तपासणी व माल साठवणूक प्रक्रिया ‘नाफेड’च्या नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पडली. तसेच विक्रीच्या वेळी संबंधित सोसायटीकडून शेतकऱ्यांना विक्रीनंतर ७२ तासांच्या आत रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र सणासुदीला देखील रक्कम न मिळाले नाही. अखेर पाठपुरावा करून ७५ टक्के रक्कम दिली..मात्र २५ टक्के राखून ठेवल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कांदा लागवडीसाठी घेतलेले कर्ज, मजुरी, वाहतूक, पॅकिंग आदी सर्व खर्च भागविणे कठीण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना मुलींचे लग्न, शैक्षणिक शुल्क, शेती कर्जाचे हफ्ते आदींसह अत्यावश्यक खर्चासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे थकित रक्कम १० दिवसांच्या आत जमा करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली..Farmer Protest: तुटपुंजी भरपाई नको, कर्जमाफी द्या .अन्यथा मुलाबाळांसोबत आंदोलन करूआमच्या व्यथा ‘नाफेड’च्या दिल्ली कार्यालयाला सांगा. पुढील दहा दिवसांत जर रक्कम मिळाली नाही तर आम्ही मुलाबाळांसोबत येऊन ‘नाफेड’ कार्यालयासमोर उपोषणाला बसू. जर कोणी टोकाचा निर्णय घेतला तर सरकार आणि ‘नाफेड’ जबाबदार राहील, असा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिला..आम्ही ग्राहक व्यवहार विभागाला ओळखत नाही, आम्ही कांदा ‘नाफेड’ला दिला,’’ या शब्दांत शेतकरी शाखा व्यवस्थापक बी. एन. पटनायक यांना जाब विचारत होते. या वेळी वित्त विभागाचे उपव्यवस्थापक श्री. अवस्थी निरुत्तर झाले होते. अखेर दिल्ली कार्याकडे पाठपुरावा करून तुमच्या पैशांचा प्रश्न सोडवू, असा शब्द दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कार्यालय सोडले. तोपर्यंत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.