Pune News : कांद्याला ३५ रुपये हमीभाव मिळवा. संपूर्ण कर्जमाफी व्हावी,ऊसाला ५ हजार रुपये हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यासाठी दौंड तालुक्यातील कानगाव येथील विठ्ठल मंदिरामध्ये शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन गुरूवार (ता.१८) पासून सुरू आहे. या आंदोलनाचा रविवारी चौथा दिवस असून या आंदोलनाला गावातील महिला, परिसरातील इतर गावांचाही पाठिंबा मिळत आहे..सुरू असलेल्या आंदोलनाला शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, दौंडमधील कुसेगाव पडवी, कडेठाण, हातवळण, पाटस, गार, सोनवडी अशा गावांच्या शिष्टमंडळाने आंदोलनाला भेटी देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. रविवारी आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने महिला व शेतकरी सहभागी झाल्या होत्या. .यावेळेस आंदोलन स्थळी भजन व बोंबाबोंब आंदोलन केले. आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने शेतकरी मंदिरामध्ये ठाण मांडून बसले आहेत. वास्तविक शेतकरी सध्या चारही बाजूने अडचणीत आला आहे. .Onion Rate : खरेदी केंद्रे सुरू करा, कांद्याला भाव द्या.आर्थिक संकटात आला आहे. एका बाजूला पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचा उभा शेतीतीमाल पावसाने नष्ट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याच शेतीमाला बाजार भाव मिळत नाही..नाशिक पाठोपाठ पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा निर्मिती व साठवणूक होत असते. त्याचप्रमाणे शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय सुद्धा केला जातो व किमान आठ ते दहा कारखान्याला ऊस पुरेल एवढा ऊस पिकवला जातो. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेतीमालावरती व शेतीमालाच्या बाजार भावा वरती अवलंबून आहे. .Onion Rate: नाफडेची ट्रक अडवून केली घोषणाबाजी.परंतु कोणत्याही शेतीमाला बाजारभाव नसल्यामुळे पावसाने होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी आक्रमक झाले आहे. त्यामुळे धरणे आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे व मागण्या मान्य होईपर्यंत सदर आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे, अशी माहिती शेतकरी आक्रोश समितीचे भानुदास शिंदे यांनी सांगितले..या आंदोलनामध्ये भाऊसाहेब फडके, सयाजी मोरे, रामदास पवार, गणपत नलवडे, नारायण फडके, दादासाहेब गवळी, किसन चौधरी, नामदेव फडके, डॉ बापूराव फडके, बापूराव गवळी, सुरेश शिंदे, बाळासाहेब सरडे, महादेव फडके, रामभाऊ कोर्हाळे, संभाजी फडके, राम गवळी, नामदेव फडके, तुकाराम भदर्गे, राघू मोरे, बबन चौंडकर, आप्पासाहेब फडके, आप्पासाहेब कोर्हाळे, संतोष गवळी असे अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.