Ahilyanagar News: शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत असून, त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी व्यवसायाची उन्नती साधावी, असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले..शेवगाव तालुक्यातील वाडगाव (थाटे) येथे मृद व जलसंधारण विभाग व वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य (पुणे) तसेच जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक (वॉटरशेड) महोत्सव झाला. .Farmer Scheme : केंद्र सरकार एमआयएस व पीडीपीएस योजना बंद करणार ?.शेवगाव तालुक्यातील वाडगाव, थाटे, हसनापूर, वरखेड, चेंडेचांदगाव, सुळे पिंपळगाव व बेलगाव या सात गावांतील शेतकरी, नागरिक सहभागी झाले होते. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी पाणलोट विकास कामे, शेततळे, शेती अवजारे, फळबाग लागवड, बचत गटांना प्रोत्साहन आदी विविध कृषी योजना राबविण्यात आल्या आहेत..Farmer Scheme : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या दोन योजनांचे करणार मूल्यमापन; योजना बंद होणार? .हा प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा तथा पर्यावरण रिसोर्स सेंटर, अहिल्यानगर यांच्या प्रयत्नातून राबविण्यात येत आहे. वाडगाव (थाटे) येथे सोमवारी सकाळी प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण, शेततळे जलपूजन तसेच योजनेतील वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत शेती अवजारे वाटप करण्यात आले. आत्मा योजनेंतर्गत उत्पादन पद्धती घटकांत रब्बी हंगामासाठी शेतकरी बचत गटांना गहू व हरभरा बियाण्यांचे वाटप करण्यात आले..पर्यावरण रिसोर्स सेंटरचे संस्थापक डॉ. डी. आर. दातीर यांनी शेवगावातील सात गावांत सुमारे २ कोटी २२ लाख रुपये खर्चातून १२४ शेततळे पूर्ण झाल्याची माहिती दिली. वाडगाव येथील सरपंच महादेव देवरे, सुनील गोर्डे, तुषार दातीर, अमोल कापसे, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, मंडळ कृषी अधिकारी घुले, निलेश भागवत, दत्तात्रय बिचकुल, बाबासाहेब गोरडे, संभाजी काटे, मडके यांच्यासह संबंधित गावांतील पाणलोट समितीचे अध्यक्ष व सचिव, शेतकरी बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दीपक कुसाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर महादेव जवरे यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.