Crop Sowing Area Marathwada: उन्हाळी हंगाम २०२६ मधील परभणी जिल्ह्यातील अंतिम पेरणी क्षेत्र कृषी व महसूल विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा ८ हजार २२९ हेक्टरवर पेरणी झाली असून, २०२५ मधील ७ हजार ८२६ हेक्टरच्या तुलनेत ४०३ हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र, जिल्ह्याच्या १२ हजार ३०१ हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत यंदाची पेरणी ४ हजार ७२ हेक्टरने कमी राहिली..यंदाही जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाला सर्वाधिक पसंती मिळाली. त्याचबरोबर चारा व अन्नधान्याच्या गरजा लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा कल बाजरी, मका आणि ज्वारीकडेही दिसून आला. जिल्ह्यात भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ७ हजार २३४ हेक्टर असताना यंदा ६ हजार ९३ हेक्टरवर पेरणी झाली. गतवर्षीच्या ६ हजार ३१ हेक्टरच्या तुलनेत भुईमुगाखालील क्षेत्रात ६२ हेक्टरची वाढ झाली आहे. जिंतूर तालुक्यात सर्वाधिक २ हजार ४५२ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली..Summer Bajra Harvesting: उन्हाळी बाजरी पीक काढणीच्या अवस्थेत.सोयाबीनची पेरणी २४१ हेक्टरवर झाली असून, गतवर्षीच्या २४२ हेक्टरच्या तुलनेत क्षेत्र जवळपास स्थिर राहिले. तिळाची पेरणी १०३ हेक्टरवर झाली असून ती गतवर्षीइतकीच आहे. सूर्यफूलाची केवळ ४ हेक्टरवर लागवड झाली.मुगाच्या क्षेत्रात यंदा वाढ नोंदविण्यात आली असून ६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी हे क्षेत्र ४९ हेक्टर होते. बाजरीची पेरणी ४०४ हेक्टरवर झाली असून, २०२५ मधील ३९१ हेक्टरच्या तुलनेत १३ हेक्टरची वाढ झाली आहे..मक्याखालील क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. यंदा ९६६ हेक्टरवर मका पेरण्यात आला असून, गतवर्षीच्या ५८२ हेक्टरच्या तुलनेत ३८४ हेक्टरची वाढ झाली आहे. ज्वारीची पेरणी २८७ हेक्टरवर झाली. तंत्राधिकारी (सांख्यिकी) पूजा थिटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथरी आणि सोनपेठ या दोन तालुक्यांत सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाली आहे. तर परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पेरणी झाली..Parbhani Crop Loan: परभणी जिल्ह्यात खरीप पीककर्जाचे २.३३ टक्के उद्दिष्ट साध्य.परभणी जिल्हा उन्हाळी हंगाम पीकनिहाय तुलनात्मक पेरणी क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)पीक--- २०२५--- २०२६भूईमूग--- ६०३१--- ६०९३सोयाबीन--- २४२--- २४१तिळ--- १०३ ---१०३मूग ---४९ ---६३बाजरी--- ३९१--- ४०४मका ---५८२--- ९६६.परभणी जिल्हा उन्हाळी हंगाम २०२६ तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)तालुका ---सरासरी क्षेत्र--- पेरणी क्षेत्र--- टक्केवारीपरभणी--- २१९२--- १२७०--- ५७.९५जिंतूर--- ३६८३ ---२४६५ ---६६.९२सेलू--- ६६१ ---३९० ---५९.०१मानवत ---१०३२ ---९८८--- ९५.७५पाथरी ---६२५ ---६७५ ---१०७.८६सोनपेठ--- ५४६ ---६९० ---१२६.३६गंगाखेड ---१२६६ ---२२०--- १७.००पालम--- ४३२--- ३६५--- ८४.३३पूर्णा--- १८६१--- ११६४--- ६२.५८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.