Chhatrapati Sambhajinagar News: भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) तालुक्यातील दोन खरेदी केंद्रांवर आतापर्यंत केवळ ३९ हजार ३७७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. खासगी बाजारात कापसाला मिळणारा चांगला दर, जिल्हा बंदी आणि उत्पादनातील घट, या त्रिसूत्रीचा मोठा फटका शासकीय खरेदीला बसला असून, शेतकऱ्यांनी सरकारी केंद्रांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, या खरेदीतून बाजार समितीला सेसपोटी ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे..तालुक्यातील शिऊर बंगला परिसरातील शुभम आणि गोदावरी जिनिंगमध्ये सीसीआयची खरेदी सुरू आहे. ‘कपास किसान’ ॲपवर तालुक्यातील ४ हजार ६२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी द्विस्तरीय पडताळणीनंतर २ हजार ९९७ शेतकरी पात्र ठरले, तर कागदपत्रांच्या त्रुटींमुळे ४७८ अर्ज नाकारण्यात आले. आतापर्यंत २ हजार ७२४ शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात आपला कापूस केंद्रावर आणला आहे..CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची ७.२४ लाख क्विंटल कापूस खरेदी.शासकीय केंद्रांवर कापसाच्या प्रतवारीनुसार ७ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मात्र, खासगी व्यापाऱ्यांचे दरही याच पल्ल्यात असल्याने आणि तिथे जाचक अटी नसल्याने शेतकरी व्यापाऱ्यांनाच पसंती देत आहेत. .CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी साडेचार लाख क्विंटलवर.सीसीआयच्या केंद्रावर एकरी ९ क्विंटल ६० किलोची मर्यादा आहे, तर पैसे बँक खात्यात जमा होण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यातच यंदा जिल्हा बंदी असल्याने इतर जिल्ह्यांतील कापूस येथे येऊ शकला नाही. त्यामुळे याचा परिणाम एकूण आवकवर झाला आहे..बाजार समितीला ३२ लाखांचा महसूलनोंदणी केलेल्यांपैकी अद्याप १ हजार ४२७ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी शिल्लक आहे. या खरेदी प्रक्रियेवर बाजार समितीला एक टक्का ‘सेस’ मिळतो. आतापर्यंत झालेल्या खरेदीनुसार समितीला अंदाजे ३२ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होईल, अशी माहिती बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.