वीज आणि बियाणे विधेयकाच्या मसुद्याविरुद्ध पंजाबमधील शेतकरी आक्रमक अनेक भागात शेतकऱ्यांची रस्त्यावर उतरून आंदोलने ही विधेयके मागे घेण्याची मागणी .Farmers Protests Punjab: पंजाबमध्ये वीज सुधारणा विधेयक २०२५ (Electricity (Amendment) Bill, 2025) आणि बियाणे विधेयक (Seed Bill, 2025) मसुद्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने तीव्र झाली आहेत. या विधेयकांविरुद्ध शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. पंजाबमधील अनेक भागात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. संयुक्त किसान मोर्चा (SKM) च्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी या विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यांनी यावेळी ही विधेयके मागे घेण्याची मागणी केली..शेतकऱ्यांनी प्रस्तावित विधेयकांच्या प्रतींची होळी केली. या निदर्शनात राज्य वीज कंपनीचे कर्मचारीही सहभागी झाले होते. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी आज मंगळवारी चंदीगडमध्ये बैठक बोलावली आहे..Farmer Protest: शेतकरी चळवळीला मोठा धक्का, शेतकरी नेते पी. आर. पांडियन यांना १३ वर्षांची शिक्षा.बीकेयू (एकता उगराहां) चे अध्यक्ष जोगिंदर सिंग उगराहां म्हणाले की, कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने वीज क्षेत्राचे केंद्रीकरण आणि खासगीकरण करण्याचा या वीज सुधारणा विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक तीन कृषी विधेयकांपेक्षा खूपच धोक्याचे आहे. कारण वीजेविना शेती करणे शक्य नाही. .Adivasi Protest: प्रलंबित मागण्यांसाठी मेळघाटचे आदिवासी देणार नागपुरला धडक.सरकार पंजाब विद्यापीठ, भाखडा ब्यास व्यवस्थापन मंडळ (बीबीएमबी) यासह महत्त्वाच्या राज्याची मालकी असलेल्या संस्थांचे पद्धतशीरपणे खासगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. .संयुक्त किसान मोर्चाचे नेते जंगवीर सिंग चौहान म्हणाले की, वीज सुधारणा विधेयकाचा केवळ शेतकऱ्यांवरच नव्हे तर खासगीकरणाच्या माध्यमातून सामान्य लोकांवरही त्याचा परिणाम होईल. खासगीकरण करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे. या माध्यमातून वीज खर्च वाढणार आहे. शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदानही थांबवले जाणार असल्याचा दावा त्यांनी केला..संयुक्त किसान मोर्चाचे आणखी एक नेते बलविंदर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास प्रीपेड मीटर काढून टाकले जातील आणि त्या जागी जुने मीटर पुन्हा बसवण्यात येतील. यामुळे वीज खर्च वाढेल आणि पंजाब वीज महामंडळाच्या मालमत्तांची जबरदस्तीने विक्री केली जाईल. या विधेयकाचा मसुदा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सादर करणार आहे. यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे..याआधी या विधेयकाविरोधात ५ डिसेंबर रोजी किसान मजदूर मोर्चाने दोन तास रेल्वे मार्ग रोखून आंदोलन केले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.