Sangli Farmers Protest For Krishna River Water: कोयना धरणात तब्बल ८९ टीएमसी पाणीसाठा असतानाही, कृष्णा आणि कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. यामुळे नद्या कोरड्या पडल्या आहेत. यामागे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वाळविण्याचे कारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी आज भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) याठिकाणी कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले. .''शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत नदीपात्रातून हलणार नाही,'' असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. चार दिवसांच्या आत जर येथे पाणी नदीत पोहोचले नाही तर आम्ही सगळे शेतकरी कोयनानगरला जाऊन आमच्या हाताने पाणी सोडणार आहोत, असा इशारा शेट्टी यांनी सरकारला दिला. .Farmers Protest: अकोल्यात दुष्काळग्रस्त शेतकरी, श्रमिकांचा महामुक्काम सत्याग्रह सुरूच.जाणीवपूर्वक कृष्णा नदी कोरडी करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करावा, या उद्देशाने जलसंपदा विभागाने आणि मुख्यमंत्र्यांनी हे कटकारस्थान केले आहे. यामुळे कृष्णा नदी कोरडी पाडली आहे, असा आरोप त्यांनी केला..Sugarcane Price Protest: ऊसदरासाठी आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे; २५ ऑक्टोबरला कोल्हापूर जिल्ह्यात मोटारसायकल रॅली, राजू शेट्टींची माहिती .यावर्षी कोयना धरण १०० टक्के भरलेले आहे. आजही धरणात ८९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. यामुळे पाणी टंचाई आहे असे सांगण्याचा सरकारला अधिकार नाही. या ८९ टीएमसी पाण्याचे पुढे काय करणार आहेत? याचे नियोजन अजूनही सरकारकडे नाही. मी याबाबत वारंवार जलसंपदा विभागाला विचारणा केली. हे पाणी कसे वापरणार आहात? त्यांच्याकडून सांगितले जात आहे की, कालवा समितीची बैठक झालेली नाही. त्यासाठी लवकरात लवकर बैठक घेऊन पाणी वापराचे नियोजन करावे. कसलेही नियोजन नसताना नदी कोरडा का पाडली? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. अन्यथा सरकारला आम्ही सोडणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला..कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळे नदीकाठावरील हजारो एकर शेती संकटात सापडली आहे. ऊस, भाजीपाला आणि इतर नगदी पिके डोळ्यादेखत वाळू लागली आहेत. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. एवढेच नव्हे, तर नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.