Wardha News : पंधरा दिवसात शासनाने ओला दुष्काळ जाहिर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. त्यासाठी वर्धा हेच आंदोलनाच केंद्र राहील. या आंदोलनात पोलिसांकडील बंदुकीच्या गोळया कमी पडतील, पण शेतकऱ्यांच्या छात्या कमी पडणार नाही, असा गर्भीत इशारा शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी दिला. .शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह सोयाबीन, कापसाला रास्त भाव त्यासोबतच ओला दुष्काळ जाहिर करुन सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत या मागणीसाठी शेतकरी संघटना (क्रांतीकारी) च्या वतीने रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता.२५) आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आयोजीत सभेत श्री. तुपकर बोलत होते..Ola Dushkal: राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा.यावेळी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. श्री. तुपकर पुढे म्हणाले, सद्याचे सरकार हे भांडवलदारधर्जीणे आहे. त्यांची मागणी नसतानाही भांडवलदार मित्रांचे लाखो कोटींचे कर्ज चुटकीसरशी माफ केले जाते. निवडणूकांपूर्वी सातबारा कोरा करु म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाल्यावर मात्र योग्य वेळ आली की कर्जमाफी करु असे सांगतात. .अतिवृष्टी, संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या परिणामी शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. त्यामुळे कर्जमाफीची हीच खरी वेळ असल्याचे कोणीतरी श्री. फडणवीस यांना सांगीतले पाहिजे. त्यावरुनच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा खुलासा होतो. .Ola Dushkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; निकष बदलून मदत करा.सद्या अतिवृष्टीने सर्वदूर हाहाकार उडाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने अडचणीतील शेतकऱ्यांसाठी तिजोरी खुले करणे गरजेचे होते, असेही ते म्हणाले. आपत्तीकाळात भरपाईसाठी असलेली दोन हेक्टरची मर्यादा हटवित सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीच्या प्रमाणात मदत दिली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. .वर्धा येथील या मोर्चामुळे राज्य सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष्य देण्याचा दबाव वाढला आहे. त्यामुळे येत्या काळात क्रांतीकारी शेतकरी संघटा व सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी संघटनेचे विदर्भ प्रमुख किरण ठाकरे उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.