Ahilyanagar News : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा लिलाव सुरू करावा, अशी मागणी करत शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहायक निबंधकांना घेराव घालून आंदोलन केले..श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वीस दिवसांपासून मोकळ्या कांद्याचे लिलाव बंद केलेले आहेत. शेतकरी मोकळा कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणताना ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये घेऊन येतो. त्याचे वजन प्लेट काट्यावर करून त्या पावतीचे पैसे, कांदा लिलाव सुरू असताना खाली ओतला जाणारा कांदा पुन्हा ट्रॉलीत भरण्याचे पैसेही शेतकरीच देतात. .Onion Import Duty: श्रीलंकेकडून पाच पटीने कांदा आयात शुल्कात वाढ.लिलाव झाल्यावर ट्रॉली खाली करताना डम्पिंग ट्रॉलीमुळे एका खटक्यावर ट्रॉली खाली होते. तेथे कांद्याच्या कोणत्याही कामाला हमालांचा हात लागत नाही. त्यामुळे ‘काम नाही तर पैसा पण नाही’ या कायद्यानुसार शेतकऱ्यांनी हमाली व मापाई देण्याचा प्रश्नच येत नाही. .Onion Cultivation: खानदेशात कांदा पीक स्थिती बरी; पावसामुळे सिंचन बंद.मात्र मोकळा कांदा बाजार बेमुदत बंद करून शेतकऱ्यांना त्यांचा कांदा गोणी मध्येच विक्रीसाठी आणण्यास मजबूर केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना गोणी मध्ये कांदा विक्रीसाठी आणण्याचा खर्च ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल तर मोकळा कांदा विक्रीसाठी फक्त ८० ते ९० रुपये प्रति क्विंटल खर्च येतो. त्यातही श्रीरामपूरला कमी दर दिला जात असल्याचा संघटनेच्या नेत्याचा आरोप आहे..श्रीरामपूरच्या सहायक निबंधकांनी तातडीने हस्तक्षेप करून बंद करण्यात आलेला मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करावा, त्यासाठी शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी व शेतकरी संघटना प्रतिनिधीची बैठक घेऊन मोकळा कांदा बाजार सुरू करावा यासाठी शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता वानखेडे, नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, कोमल वानखेडे, मंदा गमे, आशाताई महांकाळे, शीतल पोकळे, सुनीता अमोलीक, सुनंदा चोरमल, शीला वानखेडे, सोनाली विटेकर ,युवा आघाडीचे मयूर भनगडे, मधू काकड, बाळासाहेब घोगरे, अशोक आव्हाड, विष्णू भनगडे, रंगनाथ पवार, अर्जुन दातीर, श्रीराम त्रिवेदी, बाबासाहेब गायकवाड, अंबादास गमे, संतोष दातीर, भानुदास चोरमल, नीलेश जाधव, गणेश आदिक, जगदीश खरात, युवराज देवकर आदींसह पदाधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात आंदोलन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.