Nashik News : अतिवृष्टीने जिल्ह्यासह निफाड तालुक्यातील खरीप पिकांसह द्राक्षबागांची मोठी हानी झाली. मोठे नुकसान असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ कर्जमाफीचा निर्णय घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी उगाव परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवार (ता .२) रोजी दसऱ्याच्या दिवशी विनता नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले. .या आंदोलनाने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. अखेर दोन तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. उगाव व परिसरातील दत्तात्रेय सुडके, प्रभाकर मापारी, मधुकर ढोमसे, छोटूकाका पानगव्हाणे, साहेबराव ढोमसे, सोमनाथ पानगव्हाणे, नंदू चव्हाण, एकनाथ निकम, अब्दुल शेख, राजेश खापरे, शिवलाल ढोमसे आदी शेतकरी सकाळी दहाच्या सुमारास विनता नदीकाठी जमले. .‘संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर करा’ अशा घोषणा देत विनता नदीच्या प्रवाहात उतरले. परिसरातील सुमारे ४०० वर शेतकरी नदीकाठावर जमा झाले होते. ते मोठमोठ्याने घोषणा देत होते. प्रशासनाला ही बाब समजताच त्यांची धावपळ उडाली..Crop Damage Survey : पीकहानीचे पंचनामे रखडले.तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक गणेश गुरव हे फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले. राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधीही या ठिकाणी आले. आंदोलक प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त करीत होते. पंचनामे करताना पिकांबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर केला. प्रशासकीय अधिकारी व भोसले यांनी आंदोलकांशी चर्चा करीत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, मात्र, आंदोलक मागणीवर ठाम राहिले..तहसीलदार नाईकवाडे, पोलिस निरीक्षक गुरव, श्री.भोसले यांनी शिष्टाई करीत वरिष्ठ स्तरावरील मंत्री व अधिकारी यांच्याशी संपर्क साधत तणावाची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर द्राक्षबागांचे पंचनामे करण्याचे आश्वासन देण्यात आल्यावर दोन तासांनी विनता नदीपात्रात उतरलेले आंदोलक बाहेर आले. मात्र, कर्मचाऱ्यांनी यात दुजाभाव केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला..Crop Damage Survey : पिकांचे ६० टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण.राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचा अहवाल ग्राह्य धरावाकृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान निदर्शनास आणून दिले आहे. द्राक्षाच्या नुकसानीसाठी लातूर व धाराशिवबाबत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने दिलेला अहवाल ग्राह्य धरावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दिली..द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याचे आदेश नाही,असे प्रशासनाकडून सांगितले जाते.वास्तविक,द्राक्षबागांत साचलेले पाणी व त्याचा झालेला परिणाम याची व्याप्ती पाहता उत्पादन किती येईल, याची शाश्वती नाही. कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करण्यास विलंब झाल्यास पुनश्च आंदोलन करू.-दत्तात्रय सुडके, आंदोलक, उगाव.उगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतची माहिती प्रशासकीय पातळीवर संकलित करण्याचे काम सुरू आहे. आंदोलकांच्या मागण्याही शासनापर्यंत पाठविणार आहे.-विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.