Pune News : कानगाव (ता. दौंड) येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने कांद्याला हमीभाव, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी विठ्ठल मंदिरामध्ये धरणे आंदोलन मागील अकरा दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाचा शनिवारी (ता. २७) अकरावा दिवस होता. अद्याप शासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि अंगावरील कपडे जाळून शासनाचा जाहीर निषेध केला..कांद्याला ३५ रुपये हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी. शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनात शेतकऱ्यांनी शनिवारी आक्रमक होत आंदोलन केले. शेतकरी चारी बाजूंनी आर्थिक संकटांमध्ये सापडला आहे. .Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा शब्द पाळू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेतकऱ्यांना आश्वासन.शासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याच शेतीमालाला बाजारभाव नाही व अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असून शेतकऱ्यांना मुलांची शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाहीत. दवाखान्यांमध्ये बिल भरण्यासाठी पैसे नाहीत, उदरनिर्वासाठी सुद्धा पैशांची चंणचण भासत आहे. शेतीच्या पुढील भांडवलासाठी पैसे नाहीत. .अशी अवस्था असताना शासन प्रशासन फक्त अतिवृष्टी पाहणी दौऱ्याच नाटक करून वेळकाढूपणा करत आहे. वास्तविक ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणे गरजेचे असून, शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज आहे. नाहीतर थोड्या दिवसांमध्ये नेपाळसारखी परिस्थिती भारतामध्ये सुद्धा होऊ शकते, याचे भान शासनाने ठेवणे गरजेचे असल्याचे कृती समितीने म्हटले आहे..Farmer Loan Waiver : कर्जमुक्तीसाठी‘हर घर, हर खेत काला झेंडा’.आंदोलनात हे शेतकरी सहभागी :या आंदोलनावेळी भानुदास शिंदे, नानासो किसन चौधरी, तुकाराम फडके, काका कोंडे, सयाजी मोरे, गणपत नलावडे, नामदेव फडके, भाऊसाहेब फडके, संभाजी निगडे, दादासो गवळी, राजेंद्र गवळी, अनिल फडके, डॉ. बापूराव फडके, सदाशिव चौधरी, मोहन धावडे, चंद्रकांत चाबुकस्वार, चंद्रकांत कोऱ्हाळे, जगन्नाथ मेटे, पापाभाई शेख, नीलेश मोरे, अक्षय जाधव, गोरख कोऱ्हाळे, ज्ञानदेव गुंड, शामराव फडके, दत्तात्रय फडके, अनिल मोरे, सोपान हरगुडे, रामदास पवार इत्यादी शेतकरी उपस्थित होते..शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा :उद्योगपतींना १६ लाख कोटींची कर्जमाफी मिळते, करमाफी मिळते व त्यांचे लाखो कोटींचे कर्ज ‘राईट ऑफ’ केले जाते. परंतु शेतकऱ्यांना मात्र आठ आणि दहा हजार रुपये देऊन बोळवण केली जाते. शेतकऱ्यांना सुद्धा अर्थशास्त्र चांगले कळते. त्यामुळे शासनाने वेळीच योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.