Amaravati News : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या भरपाईपोटी एकरी १७५० रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चांदूरबाजार तहसील कार्यालयात ताटवाटी आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदारांच्या टेबलवर १७५० रुपये भिरकावत शासन धोरणाचा निषेध करण्यात आला. .राज्यासह चांदूरबाजार तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची संततधार होती. त्यानंतरच्या काळात अनेक भागात अतिवृष्टी नोंदविण्यात आली तर काही परिसरात ढगफुटीसदृश पाऊसही झाला. या साऱ्याच्या परिणामी शेती पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. .Rain Crop Damage : पावसाने खानदेशात हानी.अनेक भागातील जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे कधीच भरून न निघणारे नुकसान झाले. खरीप पिकाच्या एकरी व्यवस्थापनावर शेतकऱ्यांचा एकरी सरासरी ५० हजार रुपयांचा खर्च झाला, अशी स्थिती असताना शासनाकडून मात्र या शेतकऱ्यांची थट्टा करीत त्यांना एकरी अवघी १७५० रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे संंकटांचा डोंगर.शासनाने वेळीच या प्रकाराची गंभीर दखल घेत भरीव भरपाईसाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार तालुका अध्यक्ष प्रदीप बंड, दिनेश आमझरे यांच्यासह गजानन खुळे, माधव धोंडे, अनिल खैरवार, प्रदीप खुळै, रमेश्वर पोहोकार, गजानन ठाकरे, मदन राऊत, साहेबराव घोरमाडे, मोहन बोरवार, अरुण भुले, घनश्याम घोम, नाजूक नवले, बंडू धरपाल, संदीप मोहोड, राहूल सायरे, गजानन भेटाळू, संतोष ठाकरे, ऋषी पोहोकार, आशिष बंड, रितेश बंड, प्रज्वल भोकसे यांनी दिला. या वेळी शासनाने मदत म्हणून जाहीर केलेली एकरी १७५० रुपयांची मदत तहसीलदारांच्या टेबलवर भिरकावण्यात आली..पंजाब सरकारचा आदर्श घ्याराज्य सरकारने शेतकरी हिताचा मोठा आव आणत निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यास आता टाळाटाळ केली जात आहे. आता नुकसान भरपाईतूनही शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा प्रत्यय आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. पंजाब सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची भरपाई दिली आहे. त्याच आदर्शानुसार राज्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.