Nashik News : निफाड, सिन्नर, कोपरगाव, शिर्डी, राहता, श्रीरामपूर या तालुक्यांना वरदान ठरलेल्या आणि ११० किलोमीटरची लांबी असलेल्या नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या हालचाली सुरू झाल्याने निफाडसह सिन्नर तालुक्यातील कालव्यालगतच्या शेतकऱ्यांनी या अस्तरीकरणास विरोध दर्शवित कालव्यात ठिय्या मांडत शासनासह पाटबंधारे विभागाविरोधात संताप व्यक्त केला. .मात्र शेतकऱ्यांचा विरोध झुगारून पाटबंधारे विभागाने अस्तरीकरण सुरू केल्यास त्याविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कालवा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या उजवा कालव्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. तर याच कालव्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागले. .Canal Lining : ‘कालव्याच्या अस्तरीकरणामुळे शेतीचे अर्थकारण समृद्ध होणार’.हा कालवा झाल्यानंतर सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. अनेक साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, पालिका यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. विशेषता या कालव्याचा सर्वाधिक लाभ अहिल्यानगर जिल्ह्याला झाला. मात्र आता त्याच जिल्ह्याचे हित पाहता निफाड, सिन्नर, तालुक्याची शेती उजाड करण्याचा डाव अहिल्यानगर जिल्ह्यातील नेते करीत आहेत..दुर्घटनांना जबाबदार कोण?अस्तरीकरण झाल्यास कालव्यात जनावरांना पाणी कसे पाजणार, तसेच एखादे जनावर कालव्यात पडले तर बाहेर कसे काढणार. याच धरणाच्या जलद कालव्याला अस्तरीकरण केलेले असल्याने या कालव्यात अनेक मुले, माणसे आणि जनावरे यांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे उजव्या कालव्याचे अस्तरीकरण केल्यानंतर कालव्यात घडणाऱ्या दुर्घटनांना जबाबदार कोण? अस्तरीकरण झाल्यावर परिसरातील विहिरी पुन्हा मृतावस्थेत जाऊन कालव्यालगतची शेती उजाड होणार आहे..Canal Lining Issue: चास-कमान धरणाच्या कालव्याचे अस्तरीकरण रखडले.कालव्यालगतच्या जमिनी क्षारपड आणि खारे पाणी असणाऱ्या आहेत. मात्र कालव्यामुळे हे पाणी गोड झाले असून, कालव्यालगतच्या विहिरींवर अनेक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी तारुखेडले, तामसवाडी, करंजी येथील विठ्ठल आंधळे, गोरक्षनाथ आंधळे, दीपक जगताप, मीननाथ जगताप, श्रीहरी शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण जगताप, भारत आंधळे, नंदू जगताप, नितीन आंधळे, शंकर जगताप, संजय जगताप, शिवाजी जगताप, मधुकर पवार, शिवाजी शिंदे, मदन जगताप, रवींद्र जगताप, विलास आडांगळे, सागर जगताप, दत्ता आरोटे, दत्तू कडू, कचरू वाघ, योगेश अडसरे, सुनील निंबाळकर, किरण निंबाळकर, गोरक्षनाथ अडसरे, भारत आंधळे, शरद आंधळे, नंदू जगताप, शंकर जगताप, श्रीहरी शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे..कालव्यामुळे विहिरींना गोड पाणी उतरून जमिनीचा पोत सुधारत आहे आणि आता अस्तरीकरण केले तर गावाला दूषित पाणीपुरवठा होऊन रोगराईचा धोका वाढेल. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कालव्याचे अस्तरीकरण करू नये, असे पत्र ग्रामपंचायतीतर्फे पाटबंधारे विभागाला दिले आहे.- अनसूया आंधळे, सरपंच, ग्रामपंचायत तारुखेडले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.