Chhatrapati Sambhajinagar Farmers Water Protest : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अमळनेर वस्ती (ता. गंगापूर) येथील फुगवट्याच्या पाण्यात अमळनेर, लखमापूर, गळनिंब येथील शेतकऱ्यांनी गारठ्यात तब्बल १० तास जलसमाधी आंदोलन केले. शेवटी शेकोटीची ऊब घेत पाण्याच्या लगत अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले..जायकवाडी जलाशयाच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या असंपादित शेत जमिनीतील पिकांची नुकसान भरपाई वर्षभर सतत पाठपुरावा करून देखील अद्याप आजच्या भावानुसार मिळाली नाही. ज्या वेळेस जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरते त्या वेळेस फुगवट्याचे पाणी असंपादित शेतकऱ्यांचे क्षेत्रात येऊन पिकांचे नुकसान होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी वेळोवेळी निवेदन दिले. परंतु एक वर्ष पूर्ण होऊनही अद्यापही भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनस्थळी जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दिलीप पाटील निरपळ यांनी भेट देऊन खासदार संदीपान भुमरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत अधिकाऱ्यांशी बोलणे करून शेतकऱ्यांचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले..Sugar Farmer Protest: शरद कारखान्यासमोर भेंडवडे ग्रामस्थांचे आंदोलन.या वेळी जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर, उत्तर पैठणचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. पीक नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू, भूसंपादन साठी प्रयत्न करू, संवेदनशील पद्धतीने विषयी मार्गी लावू असे आश्वासन दिले. .त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी या वेळी पीक नुकसान भरपाई व संयुक्त मोजणी व परिशिष्ट १६ सर्व बाधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, आमच्या शेत जमिनी अधिग्रहण करून घ्याव्यात, अशी मागणी केली. याआधी ४ ऑगस्ट २०२५ रोजी जलसमाधी आंदोलन प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांनी चार महिन्यात पीक नुकसान भरपाई मोबदला देऊ असे लेखी देऊन सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही..Farmer Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची किसान युनियनची मागणी....असे दिले लेखीतहसील विभागामार्फत समिती गठित करून महसूल, कृषी, जलसंपदा विभाग संयुक्तरीत्या पंचनामे करून पीक नुकसान भरपाई प्रस्ताव विशेष बाब म्हणून शासनास मान्यतेकरिता सादर करण्यात येईल. याची कारवाई बुधवारी (ता. २४) पासून सुरू करण्यात येईल. तसेच शासन निर्णयानुसार यापूर्वी तयार करण्यात आलेले पीक नुकसान भरपाई प्रस्ताव हे छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी करिता ठेवण्यात येईल..शंभर टक्के पीक नुकसान भरपाईचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून शासनाला मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. बुधवारच्या (ता. २४) नियामक मंडळ समोर हा प्रश्न मार्गी लावणार आहे.-प्रशांत संत, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, पैठण..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.