Farmers Agitation : भंडारा पिकांचे नुकसान, दुष्काळसदृश स्थिती आणि वैयक्तिक पंचनाम्यांच्या अटीविरोधात तुमसर तालुक्यातील सीतेपार येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. मात्र, जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडून प्रशासनाचा निषेध केला..सीतेपार परिसरातील धान पिकांवर मावा व तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यातच नैसर्गिक संकटांचा सामना करीत शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या फवारण्या करून पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. सध्या तुमसर तालुका दुष्काळसदृश स्थितीत असतानाही सरसकट मदत देण्याऐवजी महसूल प्रशासनाकडून पुन्हा वैयक्तिक पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे..Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात.‘‘शासनाकडून सरसकट मदतीचे आश्वासन दिले जाते, तर पुन्हा वैयक्तिक पंचनाम्यांचा प्रपंच कशासाठी? महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष पाहणीसाठी उपलब्ध नसताना शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वैयक्तिक पंचनाम्यांमुळे गावात आपसात वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे कोणतीही अट न ठेवता संपूर्ण तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा,’’ अशी मागणी सीतेपारचे उपसरपंच जागेश्वर सार्वे यांनी केली..Solar Lighting Units Distribution हातमाग योजनेतून ४८ विणकरांना सोलर लायटिंग युनिटचे वितरण.या मागणीसाठी सरपंच भारती बन्सोड, आशीष कोरडे, शामलाल रेखाटे, हरिलाल ईसार, सचिन भोंगाडे, दशरथ ईसार, गिरीश क्षीरसागर, सचिन भोयर यांच्यासह शेकडो शेतकरी तहसील कार्यालयात पोहोचले. मात्र, तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत अखेर निवेदन न देताच शेतकऱ्यांना परतावे लागले. तुमसर तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला..सध्या दुष्काळ पाहणी आणि इतर महत्त्वाच्या शासकीय कामानिमित्त मी दौऱ्यावर आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयातील लिपिकाकडे सुपूर्द करावे. त्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल.- उपेश अंबादे, तहसीलदार, तुमसर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.