Narayangaon News: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार आवाराचा विस्तार करण्यासाठी गायरान जागा उपलब्ध असताना बाजार समितीने कोट्यवधी रुपये खर्च करून जागा खरेदी करण्याची गरज नव्हती. या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. शेतजमीन खरेदीचा व्यवहार कोणत्याही परिस्थितीत रद्द केला जाईल, असा इशारा आमदार शरद सोनवणे यांनी गुरुवारी (ता.९) दिला..जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नारायणगाव उपबाजार आवारासाठी वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीत वळणवाडी जवळ राज्य महामार्गालगत दहा एकर जागा नुकतीच खरेदी केली आहे. या व्यवहारात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप आमदार सोनवणे, बाजार समितीचे संचालक माउली खंडागळे यांनी केला आहे..Junnar APMC Fraud : जुन्नर बाजार समितीच्या जमीन खरेदीची होणार चौकशी ; पणन संचालकांचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश .हा व्यवहार रद्द व्हावा या मागणीसाठी श्री. खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.९) नारायणगाव बसस्थानक ते टोमॅटो बाजार आवार दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. उपबाजार आवारात झालेल्या सभेत श्री. सोनवणे बोलत होते..या वेळी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष देविदास दरेकर, उपसरपंच योगेश पाटे, सचिन वाळुंज, रघुनाथ लेंडे, तानाजी तांबे, बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण, भास्कर गाडगे, मेघा काकडे, पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता वाघ आदी मान्यवर उपस्थित होते..Junnar APMC : जुन्नर बाजार समिती संचालकांना शेतकऱ्यांचा घेराव.श्री. सोनवणे म्हणाले, की उपबाजार आवाराचा विस्तार करण्यासाठी जागा खरेदी करायची असेल तर त्यासाठी प्रस्ताव लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांना पाठवावा लागतो. असा कोणताही प्रस्ताव पाठवता दहा एकर जागा खरेदी करण्यात आली आहे..उपबाजार आवारासाठी खानापूर, येडगाव, हिवरे तर्फे नारायणगाव, वारूळवाडी या ठिकाणी गायरान जागा उपलब्ध असताना खासगी जागा खरेदी करण्याची गरज नव्हती. या वेळी श्री. सोनवणे यांनी पणन संचालक व सहायक निबंधक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. या वेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ.सुनील शेळके यांना देण्यात आले. संतोष चव्हाण यांनी आभार व्यक्त केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.