Government Support: शेतकरी केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर त्याने आपल्या शेतमालाचा प्रक्रियादार, ब्रँड अम्बॅसिटर आणि निर्यातदार झाले पाहिजे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खासगी कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गटांची स्थापना करावी. शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले..जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन इमारतीच्या प्लिंथ (जोता) काँक्रिटीकरण कामाचा तसेच व्यापारी गाळे बांधकामाच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅब कामाचा शुभारंभ मंत्री रावल यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते..Chia Farming: ...वाशीमच्या शेतापासून डिजिटल बाजारपेठेपर्यंत.यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने, जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, रजनीताई मगदूम, सावकर मादनाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चव्हाण, उपसभापती माधुरी सावगावे, माजी सभापती सुभाषसिंह रजपूत, सचिव सुनील गावडे यांच्यासह सभासद, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते..मंत्री रावल म्हणाले, ‘‘शेतमालावर आधारित पिकांची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी राज्यात आशियाई बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) योजनेअंतर्गत मोठे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. यासाठी जवळपास २ हजार ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिरोळसारख्या प्रगतिशील तालुक्यातही असे प्रकल्प सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.’’.Shetkari Bhavan: चिचोंडी पाटील उपबाजार समितीत साकारणार आधुनिक शेतकरी भवन.मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी शासनामार्फत मदत केली जाते. यामध्ये विविध फळे व भाजीपाल्यासाठी काढणीनंतरच्या सुविधा, प्रक्रिया आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाते. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने या योजनेसाठी प्रस्ताव तयार करावा. .त्याचबरोबर आधुनिक कोल्ड चेन, ग्रेडिंग-पॅकिंगची व्यवस्था, ई-लिलाव तसेच डिजिटल बाजारभाव उपलब्ध करून देणे आदी प्रकल्प बाजार समिती, शेतकरी उत्पादक कंपनी, उद्योजक किंवा शेतकऱ्यांनी पणन विभागाकडे सादर करावेत. या प्रकल्पांसाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही रावल यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.