Jalna News: मंठा तालुक्यातील मोठा भाग डोंगराळ असून बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तालुक्यातील शेतकरी खरीप काढणीनंतर पाणी उपलब्ध असेल तर रब्बी हंगामात हरभरा, गहू यासारखी पिके घेतात. मात्र, या पिकांच्या लागवडीत खर्च जास्त असल्याने अनेक शेतकऱ्यांना ती परवडत नाही..यामुळे तालुक्यातील वायाळ पांगरी, वाडेगाव पांढुर्णा, पिंपरखेडा आणि इतर काही गावातील शेतकऱ्यांनी तलावातील पाण्यावर गहू व हरभऱ्याच्या पर्यायी पिकाप्रमाणे कमी खर्चाचे, कमी मेहनतीचे आणि नवीन औषध गुणधर्म असलेले चिया पीक निवडले आहे..Chia Cultivation: अकोला जिल्ह्यात कृषी समृद्धी योजनेतून चिया लागवडीला चालना.उप कृषी अधिकारी गोविंद नाईक नवरे यांनी सांगितले, चिया पिकाचा कालावधी ११० दिवस असून यासाठी खत व कीटकनाशके लागत नाहीत. एकरी फक्त १ किलो बियाण्याची आवश्यकता असते आणि मजुरी खर्च अत्यल्प आहे. तालुक्यात चिया पीक उत्पादन क्षेत्र वाढविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी दयानंद वाघमोडे यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पीक पाहणी करून मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी विनोद खोबरे, आत्माचे तालुका प्रतिनिधी मोहाचे व सहायक कृषी अधिकारी राधेश्याम रणखांबे उपस्थित होते..गोविंद नाईक नवरे म्हणाले, चिया पिकाची पेरणी वेळेवर करावी, बियाणे बीज प्रक्रियेत योग्य खबरदारी घ्यावी आणि पिकावर येणाऱ्या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी चिकट सापळे वापरावेत. पिंपरखेडा येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश खराबे म्हणाले, रासायनिक खत न वापरता चिया पिकातून एकरी सुमारे पाच क्विंटल उत्पादन मिळते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागते..Chia Farming : बदलत्या हवामानात चिया पीक देईल आर्थिक स्थैर्य .आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीआरोग्यदायी अन्नपदार्थ म्हणून चिया पिकाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. योग्य नियोजन केल्यास या पिकातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येते. चिया हे ओमेगा-थ्री फॅटी अॅसिड, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले पीक आहे..औषधी वनस्पतीराज्यात मागील काही वर्षापासून चिया पिकाला शेतकरी पसंती देत आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाला बाजारभावही चांगला मिळतो. विविध पोषणमूल्ययुक्त असलेल्या चिया मुळात एक औषधी वनस्पती आहे. परंतु चिया पिकाची लागवड करताना योग्य पद्धतीनेही होणे तितकेच महत्त्वाचे असते. अन्यथा चिया पिकाच्या उत्पादनात घट होते..तीन वर्षांपासून चिया पीक घेतो. पिकाचा खर्च आणि उत्पन्न शेतकरी बांधवांना परवडणारे आहे. कापणी, मळणी हार्वेस्टरने करता येत असल्यामुळे वेळ आणि पैसा बचत होतो. याबरोबरच हे पीक पालेदार असल्याने जमिनीत पाला गाडून सेंद्रिय कर्ब वाढतो. शेतात पडलेल्या पाल्यामुळे जमीन सुपीक बनते.- संजय खराबे, पिंपरखेडा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.