Beed News: किल्लेधारूर तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीला गती मिळाली असून आजपर्यंत एकूण १३ हजार ९५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. आणखी काही शेतकरी पेरणीत गुंतले असून क्षेत्रफळात वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांच्या क्षेत्रफळात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. विशेष म्हणजे पारंपरिक हरभरा व ज्वारीचे क्षेत्र कमी झाले असून शेतकऱ्यांचा कल राजमा पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे..राजमाच्या लागवडीत झपाट्याने वाढ झाल्याचे स्पष्ट दिसते. धारूर, तांदळवाडी, आवरगाव, वाघोली, पांगरी, कोळपिंपरी, गांजपूर, चिंचपूर आणि खोडस परिसरात राजमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कमी कालावधीत उत्पादन देणारे पीक, तुलनेने कमी खर्च आणि बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता यांमुळे शेतकरी राजमाला प्राधान्य देत आहेत..Rabbi Season: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना राजम्याचं पीक फायदेशीर .दरम्यान, परतीच्या पावसामुळे मशागतीला उशीर झाल्याने काही भागात पेरणी उशिरा सुरू झाली. त्यामुळे पुढील १० ते १५ दिवसपेरणीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. नोव्हेंबर महिन्यात तालुक्यात रब्बी पेरणीला वेगआला असून हवामान अनुकूल राहिल्यास उर्वरित क्षेत्रावरही पेरणी पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे..Rajma Market: राज्यात रब्बी हंगामात राजमा लागवड वाढली | Agrowon | ॲग्रोवन.गहू पिकालाही अनुकूलतातालुक्यातील पीकपद्धतीत होत असलेले बदल आणि राजमाच्या वाढत्या लागवडीचे प्रमाण शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. येत्या काही दिवसांत थंडीचा जोर वाढणार असल्याने गहू पिकालाही यंदा चांगले दिवस येण्याची शक्यता असल्याचे कृषी खात्यातून सांगितले जात आहे..अल्प कालावधीत येणारे पीकहरभरा पिकावर मागील काही वर्षांत फुलकिडा व मर रोगाचे प्रमाण वाढल्याने शेतकरी पर्यायी पिकांचा विचार करू लागले आहेत. राजमा हे अल्प कालावधीत येणारे, मर रोगाचा प्रादुर्भाव कमी असलेले आणि बाजारात चांगला प्रतिसाद मिळणारे पीक असल्याने त्याकडे कल वाढला आहे, असे तालुका कृषी अधिकारी जनार्दन भगत यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.