Parbhani News: खुल्या बाजारात कमी दर मिळत असल्यामुळे भारतीय कापूस महांमडळ (कॉटन कॉर्पोशन ऑफ इंडिया) केद्रांवर हमीभावाने कापूस विक्रीला शेतकऱ्यांची पसंती दिसत आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील सीसीआयच्या १४ पैकी १३ केंद्रांवर २ लाख ७ हजार ४७ क्विंटल कापसाची खरेदी झाली तर या दोन जिल्ह्यांत खासगीत १ लाख १ हजार ९८१ क्विंटल कापसाची खरेदी झाली. सीसीआयकडून प्रति क्विंटल सरासरी ७०३६ ते ८१०० रुपये तर खासगी खरेदीचे दर प्रति क्विंटल ६७०० ते ७३३० रुपये आहेत. .दरम्यान, या दोन जिल्ह्यांतील सीसीआयाच्या १४ केंद्रांवर कापूस विक्रीसाठी ५५ हजार ५५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १७ हजार ७८२ शेतकऱ्यांची पडताळणी झाली आहे. सीसीआयच्या केंद्रांवर हमीभावाने कापूस विक्रीसाठी यंदा प्रथमच कपास किसान मोबाइल ॲपद्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागत आहे..सोमवारपर्यंत (ता. ८) परभणी जिल्ह्यातील परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, ताडकळस या १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत ४५ हजार १०४६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १४ हजार २१४ शेतकऱ्यांची पडताळणी झाली. परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या ९ केंद्राअंतर्गंत २४ जिनिंग कारखान्यांमध्ये १ लाख ७१ हजार ५७२ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल ७०३६ ते ८१०० रुपये दर मिळाले..CCI Cotton Procurement: एकरी पाचच क्विंटल कापूस खरेदीने शेतकरी हैराण.हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, आखाडा बाळापूर, वसमत, जवळा बाजार या ४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गतच्या सीसीआयच्या केंद्रांवर कापूस विक्रीसाठी १० हजार ३५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ३ हजार ५६८ शेतकऱ्यांची पडताळणी झाली. हिंगोली, आखाडा बाळापूर, वसमत, जवळा बाजार केंद्राअंतर्गत ५ जिनिंग कारखान्यांमध्ये ३५ हजार ४७५ क्विंटल कापूस खरेदी असून प्रति क्विंटल ७०३६ ते ८०५० रुपये दर मिळाले..CCI Cotton Procurement : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस ओलाव्याची मर्यादा २० टक्क्यांपर्यंत वाढवा; तेलंगणा सरकारचे केंद्र सरकारला पत्र.खासगी १ लाख क्विंटल कापूस खरेदीखासगी व्यापाऱ्यांकडून परभणी जिल्ह्यातील ९ कृषी उत्पन्न बाजार समित्याअंतर्गत २९ जिनिंग कारखान्यांमध्ये ९९ हजार ५११ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील २ बाजार समित्यांमधील ३ जिनिंग कारखान्यांत २ हजार ४७० क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल ६७०० ते ७२०० रुपये दर मिळाले. .परभणी जिल्ह्यात सीसीआय आणि खासगी मिळून एकूण २ लाख ७१ हजार ८३ क्विंटल तर हिंगोली जिल्ह्यात सीसीआय आणि खासगी मिळून एकूण ३७ हजार ९४५ क्विंटल तर या दोन जिल्ह्यांत सीसीआय आणि खासगी मिळून ३ लाख ९ हजार २८ क्विंटल कापूस खरेदी झाली असे राज्य कापूस पणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.