Nashik News: तपोवनातील जवळपास अठराशे झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्याविरोधात नाशिककरांसह वृक्षप्रेमींनी पुकारलेल्या आंदोलनाला जनतेतून प्रतिसाद वाढत आहे. या संघर्षात स्वर्गीय शरद जोशी प्रणीत नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेनेही उडी घेतली असून नाशिककरांना वृक्षतोडीच्या विरोधात पूर्णपणे साथ देण्याचा निर्णय जिल्हा संघटनेने घेतला आहे..‘‘प्रशासनाने नाशिककरांच्या भावनांची खेळू नये, कुठल्याही परिस्थितीत ही वृक्षतोड करू नये,त्याऐवजी पर्यायी जागेचा वापर करावा. नाशिक व परिसरामध्ये जवळपास ७०० ते ८०० मंगल कार्यालय व लॉन्स असून प्रशासनाने ते भाडेतत्त्वावर घेऊन त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू ग्राम उभारावे व साधूंना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी..Wai Tree Cutting Protest : झाडे वाचली, सावली टिकली ; वाईकरांची एकजूटीचे फलित.वृक्षतोड केल्यास जिल्हा शेतकरी संघटना प्रशासनाला आपल्या स्टाईलने उत्तर देईल’’ असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. सिंहस्थाला वृक्षतोड हा पर्याय नसून इतर पर्यायी मार्गाचा वापर त्यासाठी प्रभावीपणे करणे गरजेचे असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व्यक्त केले..Tree Cutting Tender : हजारो झाडांचा अवघ्या दीड लाखाला सौदा.ढग्या डोंगर समितीचाही विरोधतपोवनातील झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करावा, तपोवनच्या पवित्रतेचे,जैवविविधतेचे व स्थानिक नागरिकांच्या भावनांचे रक्षण करावे, अशी मागणी समितीने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले असून, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले आहे..समितीचे सुरेंद्र क्षत्रिय, बजूनाथ शिरसाठ, जुगल लोया, नितीन वराडे, नंदकुमार आदींनी मागणीचे निवेदन दिले. वृक्ष पुढील पिढ्यांसाठी आधारस्तंभ असतात, या अनुभवानंतरही झाडे तोडण्याचा निर्णय घेतला जात असल्याने नागरिकांत नाराजी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.