Amravati News: केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन बियाणे विधेयकाला (सीड बिल) महाराष्ट्र राज्य किसान सभेने तीव्र विरोध दर्शविला आहे. हे विधेयक शेतकऱ्यांच्या बियाण्यांवरील पारंपरिक व घटनात्मक हक्कांवर घाला घालणारे असून, ते बहुराष्ट्रीय व मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठीच तयार करण्यात आल्याचा आरोप किसान सभेने केला आहे..बियाण्यांची गुणवत्ता सुधारण्याच्या नावाखाली शेतीला कॉर्पोरेट नियंत्रणाखाली नेण्याचा हा डाव असून, या विधेयकामुळे शेतकरी बियाण्यांच्या बाबतीत पूर्णतः परावलंबी होतील, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे हे विधेयक तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी किसान सभेने केली आहे..Seed Bill 2025 : वीज सुधारणा आणि बियाणे विधेयकाच्या विरोधात एसकेएमचे ८ डिसेंबरला आंदोलन.प्रस्तावित विधेयकात बियाण्यांची अनिवार्य नोंदणी, परवाना प्रणाली, क्यूआर कोड आणि डिजिटल ट्रॅकिंग करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे गावपातळीवर बियाणे जतन करणारे शेतकरी, आदिवासी समुदाय, तसेच छोटे बियाणे उत्पादक कायदेशीर अडचणीत सापडतील, असे किसान सभेचे म्हणणे आहे..नोंदणी नसलेल्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी आल्यास देशी व पारंपरिक बियाण्यांचे जतन, वापर आणि देवाणघेवाण हळूहळू बंद होईल. याचा थेट परिणाम जैवविविधतेवर होऊन देशी बियाण्यांचा ऱ्हास होण्याची गंभीर शक्यता असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले. निकृष्ट बियाण्यांमुळे पीकनुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ व खात्रीशीर नुकसानभरपाई देण्याची स्पष्ट यंत्रणा विधेयकात नाही..Seed Bill 2025 : कृषी मंत्रालयाने नवीन बियाणे विधेयकाचा मसुदा केला जारी; ११ डिसेंबरपर्यंत सूचना पाठवता येणार .मात्र नियमभंगाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर कडक दंड व शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद अन्यायकारक व शेतकरीविरोधी असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे.या विधेयकामुळे कृषी क्षेत्रातील अधिकार केंद्र सरकारकडे अधिक केंद्रित होणार असून यातून राज्यांच्या कृषी धोरणांवर मर्यादा येतील. त्यामुळे शेतीविषयक निर्णय स्थानिक गरजांपासून दूर जातील, अशी भीतीही संघटनेने व्यक्त केली आहे..राज्यभर आंदोलनाचा इशाराया विधेयकाला शेतकरीविरोधी ठरवत राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिला आहे. शेतकरीहिताचे मूलभूत बदल न झाल्यास केंद्र सरकारविरोधात संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.