Thane News: भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या भादाणे, आतकोली, वाशेरे येथील ९९ हेक्टर जमीन एमआयडीसीला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे..स्थानिक शेतकऱ्यांनी भिवंडी येथे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन या भूसंपादनास विरोध दर्शविला आहे. स्थानिक बाधित शेतकरी प्रकाश भोईर, चंदू जाधव, ॲड. संदीप जाधव, रमेश शेलार, गुरुनाथ भोईर, प्रदीप भोईर, संतोष राऊत, रवींद्र पाटोळे आदी या वेळी उपस्थित होते..Farmers Protest: शेतीला दिवसा विजेसाठी शिराळा वितरण कार्यालयासमोर ठिय्या .एमआयडीसीसाठी येथील जमीन अधिग्रहित करीत असल्याचा शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार, खणीकर्म विभागांकडून काढण्यात आला आहे..Farmers Protest: मागण्या मान्य न झाल्यास उड्या मारो आंदोलनाचा इशारा .त्यानंतर भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून १४ जानेवारीला स्थानिक शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यापूर्वी वेगवेगळ्या कारणांनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत, .परंतु बाधित शेतकऱ्यांना योग्य व समाधानकारक मोबदला देण्यात आला नाही, असा आरोप प्रकाश भोईर यांनी केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.