Amravati News: अमरावती जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गहू पेरणीत ऐतिहासिक वाढ नोंदली गेली असून तब्बल दशकानंतर प्रथमच गहू पुन्हा शेतकऱ्यांच्या पसंतीचे पीक ठरले आहे. सरासरीच्या तुलनेत तब्बल ३७ टक्क्यांनी अधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली असून रब्बीतील इतर पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गव्हाकडे मोर्चा वळवला आहे..जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामासाठी सरासरी १ लाख ४५ हजार ९०० हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना प्रत्यक्षात आतापर्यंत १ लाख ६० हजार २२९ हेक्टर, म्हणजेच जवळपास ११० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा गव्हाचा असून ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड झाली आहे. मागील वर्षी हे क्षेत्र केवळ ४८ हजार हेक्टर होते..Wheat Sowing: गुजरातमध्ये रब्बीत गव्हाचा सर्वाधिक पेरा.गव्हासोबतच हरभऱ्याचीही जोरदार पेरणी झाली असून यंदा ५१ हजार २८२ हेक्टर क्षेत्र हरभऱ्याखाली गेले आहे. मक्याची पेरणी ९ हजार ९६३ हेक्टर, तेलबियांची ८ हजार ४५८ हेक्टर, तर रब्बी ज्वारीची ८०० हेक्टर क्षेत्रावर नोंद झाली आहे..Wheat Sowing: जळगाव जिल्ह्यात गव्हाची ६५ हजार हेक्टरवर पेरणी.खारपाण पट्ट्यातील बदललेली पीक रचना यंदा विशेष ठरली आहे. धारणी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ३६.३६ टक्के पेरणी झाली असली तरी चांदूर रेल्वे तालुक्यात तब्बल २११ टक्के आणि दर्यापूर तालुक्यात १६८.८६ टक्के पेरणी झाली आहे. .एकूण १० तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याने यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी आशादायक ठरत आहे. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने जमिनीत पुरेसा ओलावा असून सिंचन प्रकल्पांमध्येही पाणी उपलब्ध आहे. .त्यातच कापसाच्या कमी भावामुळे शेतकऱ्यांनी सुरक्षित पीक म्हणून गहू आणि हरभऱ्याकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.दशकानंतर प्रथमच गव्हाचा बोलबाला होत असल्याने बाजारपेठेतही यंदा गव्हाची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, योग्य दर मिळाल्यास शेतकऱ्यांचे अर्थकारण सावरण्यास मोठी मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.