Solapur News : सोलापूर बाजार समितीसह जिल्ह्यातील अन्य भुसार बाजारात विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांच्या एका उडदाच्या गोणीमागे एक ते दोन किलोची सूट घेतली जाते, शिवाय फसकीच्या नावाखाली छोटी टोपली धान्य काढले जाते. तर नमुना तपासणीच्या नावाखाली मारलेल्या बंबातूनही आडत्यांचे दररोज डबे भरले जातात. शेतकऱ्यांची अशी ही उघड लूट सुरू असताना, बाजार समितीसह प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. .बाजारात उडीद, मूग पिकाचा हंगाम मागेच संपला आहे, तर सोयाबीन हंगाम सुरू झाला आहे. दोन महिन्यानंतर बाजारात तूर दाखल होईल. सध्या बाजारात शेतकरी उडीद आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेऊन येत आहेत. .Urad Sowing : शेतकऱ्यांनी उडीद पिकाखालील क्षेत्र वाढवावे .बाजार समितीत अडत्याकडे शेतीमालाची विक्री झाल्यानंतर त्याचे वजन केले जाते. या वेळी एका उडदाच्या गोणीमागे काही ठिकाणी दोन किलो तर काही ठिकाणी एक किलो सूट घेतली जाते. उडदाची गोणी ५१-५२ किलोची भरली जाते मात्र तिचे वजन ५० किलो नोंदवले जाते..सोयाबीन बाबतीतही हीच पद्धत सुरू आहे. याबाबत व्यापारी व आडते असा दावा करतात की खरेदी केलेल्या शेतीमालामध्ये हवा व काडीकचरा असल्यामुळे ही सूट घेतली जाते. मात्र शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करताना त्या धान्यातील हवा (आर्द्रता), माती, काडी कचरा व दर्जा यावरच दर ठरवला जातो..Urad Market : अहिल्यानगरमध्ये उडदाची आवक वाढून दरात घट.मग एकदा दर ठरल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालातून सूट घेण्याचा व्यापाऱ्यांचा दावा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. विशेष म्हणजे बाजार समितीसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयालाही याची पूर्ण कल्पना आहे, पण कारवाई होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या लुटीच्या प्रकरणात मात्र वरचेवर वाढ होत आहे..बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लूट होते, पिशवीला एक ते दोन किलोची सूट घेतली जाते. फसकी घेतली जाते. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना हे दिसत नाही का? तक्रार करून काही उपयोग होत नाही म्हणून तक्रार करत नाही.- पुरुषोत्तम सुतार, शेतकरी, कोंडी, ता. उत्तर सोलापूर.बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतीमाल काढून घेतला जात असेल तर हे बेकायदा आहे. या संदर्भात प्रशासनाला कडक सूचना करण्यात येतील. दोषी आढळले तर कारवाई होईल.- बाबासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री .आमच्याकडे लेखी तक्रार आली, तर त्यावर कडक कारवाई केली जाईल. मात्र जोपर्यंत लेखी तक्रार येत नाही तोपर्यंत कारवाई कशी करणार?- किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.